Government Scheme : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय निवडणूक आयोग आज दुपारी तीन वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करणार आहे. दरम्यान याच पत्रकार परिषदेत भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आगामी निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जाणार अशी शक्यता आहे.
हेच कारण आहे की, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. मतदारराजांना खुश करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन अनेक मोठे निर्णय घेत आहे.
राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने 11 मार्चला आणि 13 मार्चला आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची अशी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि या बैठकीत अनेक मोठे आणि अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे आज अर्थातच 16 मार्च 2024 रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक अतिशय महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यादेखील बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील असे बोलले जात आहे.
एकंदरीत निवडणुकीचे पडघम आता जोरात वाजत आहेत. अशातच शिंदे सरकारने पत्रकारांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजने’त ज्येष्ठ पत्रकारांना मिळणारा सन्मान निधी वाढवण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेअंतर्गत ज्येष्ठ पत्रकारांना दिला जाणारा सन्मान निधी आता २० हजार रुपये करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता ज्येष्ठ पत्रकारांना प्रत्येक महिन्याला वीस हजार रुपये मिळणार आहेत.
यामुळे ज्येष्ठ पत्रकारांना दिलासा मिळेल असे बोलले जात आहे. यामुळे पत्रकारांच्या माध्यमातून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
गेल्या वर्षीच्या अधिवेशनात विधान परिषदेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी या संदर्भात महत्त्वाची चर्चा विधिमंडळात उपस्थित केली होती.
तसेच, मुख्यमंत्र्यांनी मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात अर्थसाहाय्य वाढविण्याची घोषणा केली होती. यानुसार आता ही सन्मान निधीमधील वाढ लागू होणार आहे.
ज्येष्ठ पत्रकारांना आता आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत प्रती महिना 20 हजार रुपये एवढा सन्मान निधी मिळणार आहे. प्रत्यक्ष पात्र अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ पत्रकारांनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल, असे सांगितले जात आहे.