Gratuity Rule India : सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून विविध लाभ पुरवले जातात. पगाराव्यतिरिक्त सरकारी कर्मचाऱ्यांना शासन विविध आर्थिक लाभ पुरवते यामध्ये पेन्शनचा देखील समावेश होतो. सरकारी कर्मचारी मग ते केंद्रीय कर्मचारी असो किंवा राज्य कर्मचारी त्यांना शासनाकडून विविध लाभ पुरवले जातात. परंतु खाजगी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असे नाही.
खाजगी कर्मचाऱ्यांना केवळ कंपनीकडून ग्रॅच्यूटीचा लाभ पुरवला जातो. यामुळे खाजगी कंपनीत काम करणाऱ्या पगारदार लोकांमध्ये ग्रॅज्युटीबाबत कायमच चर्चा रंगतात. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून एका कंपनीत सलग तीन वर्षे काम केल्यानंतर देखील ग्रॅच्यूटीचा लाभ मिळू शकतो अशा बातम्या सोशल मीडियामध्ये वेगाने व्हायरल होत आहे.
अशा परिस्थितीत आज आपण खाजगी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीचा लाभ केव्हा मिळतो आणि कोणत्या कंपनीत काम करणाऱ्यांना ग्रॅच्युटीचा लाभ मिळू शकतो, ग्रॅच्युएटीची रक्कम कशी ठरवली जाते याबाबत सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना मिळतो लाभ
ग्रॅच्यूटीचा लाभ हा प्रत्येक कंपनीतील कर्मचाऱ्यांना मिळतो असे नाही तर याचा लाभ हा दहापेक्षा जास्त कर्मचारी संख्या असलेल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना दिला जातो. देशातील सर्व कारखाने, खाणी, तेल क्षेत्र, बंदरे आणि रेल्वे यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीचा लाभ संबंधित कंपनीच्या माध्यमातून दिला जातो.
ग्रॅच्युईटीचा लाभ केव्हा मिळतो
याचा लाभ एखाद्या कर्मचाऱ्याने सलग एखाद्या ग्रॅच्युइटीसाठी पात्र असलेल्या कंपनीत पाच वर्ष काम केल्यानंतर मिळतो. काही प्रकरणात मात्र पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी काम केले तरीदेखील याचा लाभ मिळू शकतो. पण यासाठी काही नियम बनवण्यात आले आहेत.
दरम्यान केंद्र शासन लवकरच खाजगी कंपनीत एखाद्या कर्मचार्याने सलग तीन वर्षे काम केले तरीदेखील ग्रॅच्युटी देण्यासाठी नियम बनवणार असल्याचा दावा केला जात आहे. याबाबत मात्र केंद्र शासनाकडून अद्याप कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.
शिवाय असा प्रस्ताव सरकारकडे प्रस्तावित आहे की नाही याबाबत देखील अद्याप माहिती हाती आलेली नाही. परंतु जर केंद्र शासनाने हा निर्णय घेतला तर देशभरातील खाजगी कंपनीत काम करणाऱ्या करोडो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
ग्रॅच्यूटीची रक्कम कशी मोजली जाते बरं
मिळालेल्या माहितीनुसार ग्रॅच्युटीची रक्कम ठरवण्यासाठी एका फॉर्मुलाचा वापर होतो. यासाठी (शेवटचा पगार) x (15/26) x (कंपनीमध्ये काम केलेले वर्ष) हा फॉर्म्युला वापरला जातो. आता आपण उदाहरणासहित ग्रॅज्युइटीची रक्कम कशी ठरवली जाते हे समजून घेऊया.
जर समजा तुम्ही एखाद्या कंपनीत पाच वर्षांपर्यंत काम केले असेल आणि तुमचा त्या संबंधित कंपनीत शेवटचा पगार हा 40 हजार रुपये असेल तर [40,000×(15/26)×5 =1,15,384] म्हणजेच तुम्हाला एक लाख 15 हजार 384 रुपये इतकी रक्कम ग्रॅच्युइटी म्हणून मिळू शकते. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की एखाद्या कर्मचाऱ्याला अधिकतम वीस लाखापर्यंतची ग्रॅच्युईटी मिळू शकते यापेक्षा अधिक ग्रॅज्युईटी कर्मचाऱ्याला दिली जात नाही.