Havaman Andaj 2023 : यंदाचा पावसाळा आता जवळपास संपत आला आहे. यंदा मान्सून काळात येऊन आणि ऑगस्ट या महिन्यात सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहेत. महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यात आत्तापर्यंत सरासरी पेक्षा सात टक्के कमी पाऊस पडला आहे.
जून ते सप्टेंबर हा मान्सूनचा काळ असतो. मात्र या चार महिन्यांपैकी तीन महिन्यांचा काळ जवळपास उलटला आहे. आता केवळ एक महिना बाकी राहिला आहे. मात्र तरीही राज्यात सरासरी एवढा पाऊस झालेला नाही. पावसाची मोठी तूट पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पावसाचे असमान वितरण जास्त त्रासदायक ठरत आहे.
काही ठिकाणी जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती तर काही ठिकाणी जुलै महिन्यात देखील चांगला पाऊस पडला नव्हता. मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगर व आजूबाजूच्या परिसरात अपेक्षित असा पाऊस पडला नाही.
कमकुवत मान्सूनमुळे यंदा खरिपातील पिके संकटात सापडली आहेत. गेल्या महिन्यात चांगला पाऊस होता मात्र या ऑगस्ट महिन्यात एकदाही मुसळधार पाऊस बरसला नाही. अशातच मात्र हवामानात तज्ञांनी परतीच्या पावसाची तारीख डिक्लेअर केली आहे.
मान्सून देशातून केव्हा माघारी फिरणार याची तारीख हवामान तज्ञांनी डिक्लेअर केली आहे. दरम्यान भारतीय हवामान तज्ञांनी ऑगस्टच प्रमाणेच सप्टेंबर महिन्यात देखील सरासरीपेक्षा कमीच पाऊस बरसेल असे मत व्यक्त केले आहे. यामुळे मात्र खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
केव्हा माघारी फिरणार मान्सून
मान्सून 2023 हा एलनिनोमुळे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरलेला नाही. या मान्सून काळात आत्तापर्यंत समाधानकारक असा पाऊस पडलेला नाही. यामुळे शेतकरी तसेच सामान्य जनता चिंतेत आहे. अशातच मात्र मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचे वेळापत्रक समोर आला आहे.
पावसाचा परतीचा प्रवास निश्चित झाला आहे. राजस्थान मधून हा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. लंडन मधील हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर अक्षय देवरस यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा पूर्व राजस्थान मधून 17 सप्टेंबर पासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.
यंदा मात्र महाराष्ट्रातून पावसाचा परतीचा प्रवास उशिराने सुरू होणार आहे. महाराष्ट्रातून 5 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान परतीच्या पावसाचा प्रवास सुरू होईल अशी माहिती शास्त्रज्ञ डॉक्टर देवरस यांनी यावेळी दिली आहे.