Havaman Andaj 2023 : सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सवाची मोठी धामधूम सुरू आहे. गणेशोत्सवाचा पर्व आनंदात साजरा केला जात आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी अर्थातच 19 सप्टेंबरला गणेशोत्सव सुरू झाला असून आज अर्थातच 28 सप्टेंबरला या उत्सवाची सांगता होणार आहे. आज गणेश विसर्जन होणार आहे.
आज गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहेत. पुढल्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया ! अस म्हणतं आज गणरायाचे विसर्जन केले जाणार आहे. मात्र आज गणेश विसर्जनाच्या दिवशी अर्थातच अनंत चतुर्दशीच्या दिवशी महाराष्ट्रभर जोरदार पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज आहे.
यामुळे गणपती बाप्पाच्या निरोप समारंभाला वरून राजा हजेरी लावणार असल्याचे बोलले जात आहे. पुणे वेधशाळेने याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. आज गणेश विसर्जनाच्या दिवशी तसेच आगामी तीन ते चार दिवस राज्यभर जोरदार पावसाची हजेरी राहणार असा अंदाज आहे. खरंतर राज्यात गणेश चतुर्थीच्या दिवशी अर्थातच गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी वरूणराजाचं आगमन झालं.
त्याआधी म्हणजे दहा तारखेपासून ते जवळपास 18 तारखेपर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडेच होते. मात्र 19 सप्टेंबर पासून हवामानात मोठा बदल झाला आणि लाडक्या गणरायाने शेतकऱ्यांची चिंता हरली. राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण तयार झाले. 22 तारखेला गौरी पूजन झाले. त्या दिवसापासून मात्र पावसाचा जोर खूपच वाढला.
मध्यंतरी 25 तारखेला राज्यातून पावसाचा जोर कमी झाला होता. पण 26 तारखेला पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. काल देखील राज्यातील विविध भागात हलका ते मध्यम पाऊस झाला आहे. काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सऱ्या देखील बरसल्या आहेत. अशातच आता आजपासून आगामी तीन ते चार दिवस अर्थातच एक ऑक्टोबर पर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर पुणे वेधशाळेने 3 ते 4 ऑक्टोबर पर्यंत पाऊस सक्रिय राहू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे. एकंदरीत महाराष्ट्रावर आगामी काही दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑगस्ट महिन्यातील पावसाचे तूट यामुळे बऱ्यापैकी भरून निघण्यास मदत होईल असा आशावाद आता व्यक्त होत आहे. खरंतर ऑगस्ट महिन्यात झालेल्या कमी पावसामुळे महाराष्ट्र अक्षरशः दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा होता. सप्टेंबर मध्ये जर चांगला पाऊस झाला नसता तर पिण्याच्या पाण्याचे देखील हाल झाले असते.
पण बाप्पा आला आणि शेतकऱ्यांचे विघ्न हरून गेला. दरम्यान आज बाप्पा आपल्या सर्वांचा निरोप घेणार आहे, आज सर्वजण भरल्या डोळ्यांनी बाप्पाला निरोप देणार आहेत. मात्र गणपती विसर्जन भर पावसातच करावे लागणार आहे.