हवामान खात्याचा नवीन अंदाज आला रे…! राज्यातील ‘या’ भागात तुफान गारपीटीची शक्यता, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Havaman Andaj : महाराष्ट्रात सध्या ऊन, पावसाचा खेळ सुरू आहे. राज्यातील काही भागात तापमान चाळीस अंश पेक्षा अधिक झाले आहे. उत्तर महाराष्ट्रातील मालेगावात राज्यातील सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. धुळे आणि सोलापूर येथे चाळीस अंश सेल्शियस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे.

जेऊर आणि बीड या ठिकाणी 41 अंश सेल्शियस पेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे या भागांमध्ये प्रचंड उकाडा पाहायला मिळतोय. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

एकीकडे महाराष्ट्रातील काही भागात उकाड्याने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे तर दुसरीकडे राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाचे सत्र सुरू झाले आहे. अवकाळी पावसामुळे सर्वसामान्यांना ऊकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र याने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

वादळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांनी अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती पीक वाया गेले आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. विशेष म्हणजे भारतीय हवामान खात्याने आज देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हवामान खात्याने आज राज्यातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र तथा उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे. तसंच काही ठिकाणी तुफान गारपिटीचा अंदाज देण्यात आला आहे.

काय म्हणतंय हवामान विभाग

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील जवळपास 21 जिल्ह्यांमध्ये आज वादळी पाऊस आणि काही जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता आहे. आज विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होईल असे आयएमडीने स्पष्ट केले आहे.

विदर्भ विभागातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात वादळी पाऊस, वारा अन गारपिटीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच आज मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात गारपिट होणार अशी शक्यता असून या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना गारपिटीचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.

एवढेच नाही तर आज राज्यातील खानदेश विभागातील जळगाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर या सदर जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे सदर भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

या वादळी पावसामुळे उकाड्याने थोडा दिलासा मिळणार आहे. पण शेतकऱ्यांना मात्र याचा मोठा फटका बसणार आहे. म्हणून हवामान खात्याच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Leave a Comment