Havaman Andaj : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडे केली आहे. जुलै महिन्यात महाराष्ट्राला पावसाने झोडपले मात्र आता पावसाने उघडीप दिल्याने राज्यातील शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. विशेष म्हणजे भारतीय हवामान विभागाने या चालू ऑगस्ट महिन्यात आणि पुढील सप्टेंबर महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असा अंदाज नुकत्याच काही दिवसांपूर्वी व्यक्त केला आहे.
यामुळे, बळीराजाची धाकधूक वाढली आहे. दरम्यान हवामान विभागाने आज राज्यात कस हवामान राहणार याबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचा आस आता उत्तरेकडे सरकला आहे परिणामी राज्यात पावसाचा खंड पाहायला मिळत आहे. तसेच राज्यातील काही रागात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
आज देखील राज्यातील कोकण विभागात हवामान विभागाने पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. आज दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असे सांगितलं गेले आहे. पण उर्वरित राज्यात ढगाळ आकाश, ऊन-सावल्यांच्या खेळात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होणार असे IMD ने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आज गुरुवारी 10 ऑगस्ट रोजी कोकणात पावसाची शक्यता आहे. कोकणातील दक्षिण भागात पावसाची शक्यता आहे. दक्षिण भागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत आज तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाची उघडिप राहील आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
एकंदरीत केल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मात्र काही हवामान तज्ञांनी येत्या तीन ते चार दिवसात हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच 15 ऑगस्ट नंतर राज्यात बहुतांशी भागात जोरदार पावसाची शक्यता काही हवामान तज्ञांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.