Havaman Andaj : काल देशभरातील गणेश भक्तांच्या घरी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. यामुळे गणेश भक्तांमध्ये कमालीचे समाधान पाहायला मिळत आहे. 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान यावर्षी गणेशोत्सवाचा सण साजरा केला जाणार आहे. काल गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.
परंतु काल राज्यात कुठेच मोठा पाऊस पडला नाही. फक्त काही तुरळक भागात हलक्या पावसाची नोंद करण्यात आली. जोरदार पाऊस मात्र कुठेच झाला नाही. यामुळे गणेश चतुर्थीचा मुहूर्त सुद्धा हुकला असल्याने आता मोठा पाऊस केव्हा पडणार ? असा प्रश्न बळीराजाकडून उपस्थित केला जात आहे.
अशातच मात्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यात लवकरच आता मोठा पाऊस पडणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात जोरदार पावसाची शक्यता आहे. पुण्यासह संपूर्ण राज्यात येत्या दोन दिवसात पावसाच्या जोरदार सऱ्या बरसतील असा अंदाज हवामान खात्याने नुकताच व्यक्त केला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. याचा परिणाम म्हणून आता राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे. हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असल्याने सध्या राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. याचा परिणाम म्हणून आता राज्यात चांगला पाऊस होणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
21 सप्टेंबर पासून मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात विशेषता घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातच 21 सप्टेंबर नंतर पावसाचा जोर वाढेल असे सांगितले जात आहे. पुण्यात येत्या आठवडाभर ढगाळ हवामानाची अनुभूती येणार आहे. तसेच सायंकाळी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
एकंदरीत लाडक्या बाप्पाचे आगमन तर झाले आहे मात्र अद्याप पावसाच्या आगमन झालेले नाही. परंतु यंदा गणराया नवसाला पावणार आणि गणेशोत्सवाच्या काळात जोरदार पाऊस पडणार असा आशावाद शेतकऱ्यांना लागून आहे.