पाऊस पुन्हा एकदा रजेवर ! ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार, हवामान विभागाची माहिती 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Havaman Andaj September : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस रजेवर गेला होता. संपूर्ण ऑगस्ट महिना राज्यात पाऊसच पडला नाही. यामुळे खरीप हंगामातील पिके संकटात आले होते. मात्र सप्टेंबर महिन्याची सुरुवात पावसाने झाली. या चालू महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली.

परंतु पावसाचा जोर वाढला तो सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात. सात सप्टेंबर पासून राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस बरसत आहे. 7, 8 आणि 9 तारखेला राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस बरसला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली आहे. परिणामी विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.

नद्याना देखील पूर आले आहेत आणि धरणांमधील जलसाठा देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे खरिपातील पिकांना दिलासा मिळाला असून सध्या शेतकऱ्यांमध्ये मोठी समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली.

या विभागात काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली आहे. तसेच उर्वरित राज्यातही गेल्या 24 तासात चांगला जोरदार पाऊस झाला आहे. अशातच मात्र पाऊस पुन्हा एकदा रजेवर जाणार की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. कारण की भारतीय हवामान विभागाने उद्यापासून अर्थातच 11 सप्टेंबर पासून महाराष्ट्रातला पावसाचा जोर कमी होणार असे सांगितले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उद्या अर्थातच अकरा सप्टेंबर पासून कोकण विभाग वगळता उर्वरित राज्यातून पावसाचा जोर कमी होणार आहे. म्हणजेच उद्यापासून पावसाचा जोर फक्त कोकणातच राहणार आहे. उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे.

आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार 15 सप्टेंबर पर्यंत कोकणात पावसाचा जोर असाच कायम राहील. मात्र उद्यापासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील पाऊस कमी होणार आहे. आज 10 सप्टेंबर 2023 ला राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मात्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पण आय एम डी ने आपल्या दीर्घकालीन हवामान अंदाजामध्ये पुढील संपूर्ण महिना महाराष्ट्रात पाऊस पडत राहणार अशी माहिती दिली आहे. IMD ने सांगितले की, १४ सप्टेंबरपर्यंत कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ाचा काही भाग आणि विदर्भाच्या काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

तसेच १५ ते २१ सप्टेंबर या कालावधीत कोकण विभाग, विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय २२ ते २८ सप्टेंबर आणि २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या दोन आठवड्यांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात सरासरी भरून काढेल एवढा पाऊस पडणार असा अंदाज आहे. एकंदरीत येत्या महिन्यात राज्यात सातत्याने पाऊस पडतच राहणार आहे.

दीर्घकालीन हवामान अंदाजामध्ये राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आहे. पण नुकत्याच वर्तवलेल्या आपल्या अंदाजात हवामान विभागाने उद्यापासून राज्यातील काही भागातून पावसाचा जोर कमी होणार असे स्पष्ट केल आहे. यामुळे आता ऑगस्ट प्रमाणे पावसाचा खंड पडतो की पाऊस सुरूच राहतो हे पाहण्यासारखे राहणार आहे.

Leave a Comment