HDFC Bank Loan : अलीकडे वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. परंतु जाणकार लोक वैयक्तिक कर्ज घेण्याचा सल्ला देत नाहीत. जाणकार लोकांच्या मते जेव्हा पैशांची कुठूनच ऍडजेस्टमेंट होत नसेल तेव्हाच वैयक्तिक कर्जाचा विचार केला पाहिजे.
तसेच वैयक्तिक कर्ज घेताना जी बँक सर्वात कमी व्याजदरात कर्ज देत असेल त्याच बँकेकडून असे कर्ज घेणे फायदेशीर ठरते. कारण की वैयक्तिक कर्जावरील व्याजदर हे इतर कर्जाच्या तुलनेत अधिक असते.
यामुळे वैयक्तिक कर्ज घेताना आपल्या गरजा आणि यासाठी द्यावे लागणारे व्याज या सर्व गोष्टींचा विचार करूनच हे कर्ज घ्यावे जेणेकरून सर्वसामान्यांचे फायनान्शिअल बजेट कोलमडणार नाही.
दरम्यान आज आपण खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेकडून दोन लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले तर कर्ज घेणाऱ्याला किती रुपयांचा हप्ता भरावा लागू शकतो याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एचडीएफसी बँक ही खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे.
ही बँक आपल्या ग्राहकांना स्वस्त व्याजदरात वैयक्तिक कर्ज पुरवते. मिळालेल्या माहितीनुसार एचडीएफसी बँक पगारदार लोकांना 10.50% व्याजदराने वैयक्तिक कर्ज ऑफर करत आहे. ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला असेल त्यांना या व्याजदरात वैयक्तिक कर्ज मिळू शकते.
मात्र ज्यांचा सिबिल स्कोर खराब असेल त्यांना वैयक्तिक कर्जासाठी अधिकच व्याज द्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे वैयक्तिक कर्जासाठी एचडीएफसी बँक 4999 रुपयांची प्रोसेसिंग फी देखील वसूल करते. म्हणजेच व्याजासोबतच कर्ज घेणाऱ्या व्यक्तींना ही प्रोसेसिंग फी देखील भरावी लागणार आहे.
10 लाखाचे कर्ज घेतले तर किती ईएमआय भरावा लागणार
एचडीएफसी बँकेकडून जर दहा लाखांचे कर्ज पाच वर्षांच्या कालावधीसाठी घेतले तर 10.50% व्याजदराने मासिक हफ्ता 21,494 रुपयांचा भरावा लागणार आहे. यात चार हजार 999 रुपयांची प्रोसेसिंग फी वेगळी राहणार आहे.
पाच लाखाचे कर्ज घेतले तर कितीचा हफ्ता
जर एचडीएफसी बँकेकडून एखाद्याने पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि कर्जाची परतफेड पाच वर्षांची केली तर अशा व्यक्तीला 10.50% व्याजदराने दहा हजार 747 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
दोन लाखाचे कर्ज घेतले तर कितीचा हप्ता
एचडीएफसी बँकेकडून दोन लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले आणि या कर्जाची परतफेड पाच वर्षांची ठेवली तर सदर कर्ज घेतलेल्या व्यक्तीला 10.50% व्याजदराने 4299 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे.
हफ्ता बाऊन्स झाला तर किती चार्जेस
जर समजा एखाद्या व्यक्तीने वैयक्तिक कर्ज घेतले आणि त्याला त्या कर्जाचा हप्ता नियमित भरता आला नाही तर त्याच्याकडून पेनल्टी वसूल केली जाणार आहे. पेनल्टी 18% वार्षिक व्याज प्लस टॅक्स याप्रमाणे आकारली जाणार आहे. यामुळे कर्जाचा हप्ता चुकणार नाही याची ग्राहकांनी काळजी घ्यायची आहे.