HDFC Bank Personal Loan : एचडीएफसी बँकेच्या खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल आणि तुम्हाला बँकेकडून पर्सनल लोन घ्यायचे असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे.

खरंतर, आपल्यापैकी अनेकांना अचानक पैशांची निकड भासते. अशावेळी आपण बँकेतून पर्सनल लोन घेण्याचा विचार करतो. अनेक बँका ग्राहकांना परवडणाऱ्या व्याज दरात पर्सनल लोन देत आहेत.

Advertisement

तथापि बँकेकडून उपलब्ध होणारे वैयक्तिक कर्ज हे इतर कर्जांच्या तुलनेत थोडेसे महाग असते. यामुळे वैयक्तिक कर्ज जेव्हा पैशांची कुठूनच ऍडजेस्टमेंट होत नसेल तेव्हाच घेतले पाहिजे असा सल्ला जाणकार लोक देतात.

दरम्यान आज आपण एचडीएफसी बँकेकडून जर बारा लाख रुपयांचे पर्सनल लोन घेतले तर ग्राहकांना किती व्याज भरावे लागू शकते? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Advertisement

एचडीएफसी बँकेचे पर्सनल लोनचे व्याजदर

मिळालेल्या माहितीनुसार एचडीएफसी बँक वैयक्तिक कर्जासाठी सध्या स्थितीला 10.75% ते 24 टक्के एवढे व्याजदर आकारात आहे. ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोर चांगला आहे त्यांना बँकेकडून 10.75% या किमान दरात वैयक्तिक कर्ज उपलब्ध होते.

Advertisement

750 पेक्षा जास्तीचा सिबिल स्कोर असल्यास कमी व्याजदर

ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक आहे अशा ग्राहकांना 10.75% या किमान व्याजदरात वैयक्तिक कर्ज उपलब्ध होऊ शकते. मात्र ज्यांचा सिबिल स्कोर यापेक्षा कमी आहे त्यांना वैयक्तिक कर्जासाठी अधिकचे व्याजदर द्यावे लागू शकते.

Advertisement

सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो. ज्यांचा सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक असतो त्यांना बँका सहजतेने आणि कमी व्याजदरात कर्ज देतात. 

एचडीएफसी बँकेकडून बारा लाखाचे पर्सनल लोन घेतले तर

Advertisement

जर एखाद्या ग्राहकांना 10.75 टक्के या व्याज दारात 12 लाख रुपये एवढे वैयक्तिक कर्ज एचडीएफसी बँकेने मंजूर केले तर त्याला कितीचा हप्ता भरावा लागू शकतो? अशा प्रकरणांमध्ये ग्राहकाला 25 हजार 942 रुपये एवढा मासिक हप्ता पाच वर्षांच्या कालावधीसाठी भरावा लागू शकतो.

म्हणजेच पाच वर्षांपर्यंत सदर व्यक्तीला 15 लाख 56 हजार 492 रुपये एवढी रक्कम भरावी लागणार आहे. यामध्ये तीन लाख 56 हजार 493 रुपये एवढे व्याज राहणार आहे. 

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *