HDFC FD News : गेल्या काही वर्षांमध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढली आहे. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमधून काही गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. मात्र यामध्ये लॉसेस होण्याचे प्रमाण देखील खूप अधिक असते.
म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही शेअर मार्केटशी निगडित असते, तथापि म्युच्युअल फंड मध्ये शेअर मार्केटच्या तुलनेत थोडे कमी रिस्क असतात. हेच कारण आहे की या दोन्ही रिस्की ठिकाणी गुंतवणूक करण्याऐवजी आजही अनेक जण बँकेच्या एफडी योजनेला पसंती दाखवतात.
एफडी मधून एक निश्चित आणि खात्रीशीर परतावा मिळतो. हेच कारण आहे की अनेकांनी एफडी मध्ये गुंतवणूक केलेली आहे. दरम्यान आजची ही बातमी नजीकच्या भविष्यात एफडी करू इच्छिणाऱ्यांसाठी खास राहणार आहे. कारण की आज आपण FD वर सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या पाच बँकांची माहिती जाणून घेणार आहोत.
HDFC Bank : प्रायव्हेट सेक्टर मधील एचडीएफसी ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर चांगले व्याज ऑफर करत आहे. ही बँक 390 दिवस ते 15 महिने कालावधीच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देते. या कालावधीच्या एफडीवर बँकेकडून 7.25 टक्के एवढे व्याज दिले जात आहे.
Kotak Mahindra Bank : ही बँक आपल्या गुंतवणूकदारांना तीन वर्षांपासून ते चार वर्षांपेक्षा कमी कालावधीचा FD वर 6.50% ते सात टक्क्यांपर्यंतचे व्याज ऑफर करत आहे.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक : ही बँक देखील FD वर चांगले व्याज ऑफर करत आहे. या बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 444 दिवसांच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 9% व्याजदर दिला जात आहे.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक : ही बँक आपल्या ग्राहकांना उच्च व्याजदराचा लाभ देत आहे. बँक ज्येष्ठ नागरिकांना 2 ते 3 वर्षांच्या FD वर 9.1% व्याजदर ऑफर करत आहे.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक : फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक ७५० दिवसांच्या एफडीवर ९.२१% व्याज देत आहे. या टक्केवारीच्या व्याजाचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना दिला जात आहे.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक : युनिटी स्मॉल फायनान्स बँक 1001 दिवसांच्या FD वर 9.5% व्याज देत आहे. हा लाभ ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणार आहे.