तुमच्याही घरात उंदरांचा सुळसुळाट आहे का ? मग ‘हे’ घरगुती उपाय ट्राय करा, उंदीर घरात थांबणारच नाहीत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rat Viral News : तुमच्याही घरात उंदरांचा सुळसुळाट झाला आहे का ? खबरदारीचे उपाय घेऊनही जर तुमच्या घरात उंदीर शिरला असेल आणि तुम्हाला घरातील उंदीर काढायचे असतील तर हा लेख तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे.

उंदीर घरात शिरले तर तो घरातील कोणकोणत्या वस्तूंचे नुकसान करेल हे काही सांगता येत नाही. उंदीर स्वयंपाक घरातील वस्तूंचे तर नुकसान करतोच शिवाय विद्यार्थ्यांच्या वह्या, पुस्तकं, महत्त्वाची कागदपत्रे यांनाही कुरतडतो.

यामुळे अनेक जण बाजारातून रॅट किलर आणतात आणि उंदरांना मारून टाकतात. परंतु अनेकांना उंदीर मारणे आवडत नाही. अशा वेळी न मारता त्यांना घरातून दूर कसे पळवायचे? हा मोठा प्रश्न असतो.

यामुळे आज आपण उंदराला न मारता घराबाहेर काढण्यासाठीचे उपाय जाणून घेणार आहोत. चला तर मग न मारता उंदरांना घराबाहेर काढण्याचे काही घरगुती उपाय जाणून घेऊयात.

उंदरांना घराबाहेर कसे काढायचे

  • घरात ज्या ठिकाणी उंदरांचा सुळसुळाट असेल त्या ठिकाणी कांदा सोलून ठेवला पाहिजे. कांद्याचा असणारा उग्र वास उंदरांना सहन होत नाही आणि यामुळे उंदीर घर सोडतात.
  • तसेच तुमच्या घरात ज्या ठिकाणी नेहमीच उंदीर येत असतात त्या ठिकाणी तुम्ही लाल तिखट टाकू शकता किंवा पिठाच्या गोळ्यात लाल तिखट मिसळून ते गोळे तेथे ठेवू शकता.
  • शिवाय उंदीर पळवण्यासाठी लसणाचा देखील वापर होतो. लसूण सोलून त्याचे बारीक तुकडे करून जिथे उंदीर येतो त्या ठिकाणी टाका. असे केल्याने उंदीर पळून जातील. कारण की, त्यांना लसणाचा उग्र वास देखील सहन होत नाही.
  • याशिवाय ज्या ठिकाणी नेहमीच उंदीर येतात तिथे कापसाला पेपरमिंट अर्थातच पुदिना लावून ठेवला पाहिजे असे केल्यास उंदीर घरात राहणार नाहीत.
  • जर तुमच्या घरात उंदरांचा वावर असेल तर तुम्ही त्यांना घराबाहेर काढण्यासाठी तंबाखूचा वापर करू शकता. जिथे नेहमीच उंदीर येतात त्या ठिकाणी तंबाखू टाका. तंबाखूच्या उग्र वासामुळे देखील उंदीर लांब पळतात असे म्हटले जाते.

Leave a Comment