महाराष्ट्र बोर्डाचे दहावी आणि बारावीचे निकाल केव्हा जाहीर होणार ? समोर आली मोठी अपडेट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra State Board SSC And HSC Result : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपन्न झाल्या आहेत. या दोन्ही वर्गांच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात झाल्या आहेत. आता विद्यार्थ्यांना आतुरता लागली आहे ती या परीक्षेच्या रिझल्टची. दहावी, बारावी बोर्ड परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक आता आतुरतेने रिझल्टची वाट पाहत आहेत.

10वी अन 12वी बोर्ड परीक्षेचा रिजल्ट केव्हा डिक्लेअर होणार ? हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, याच संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे.

या दोन्ही वर्गाच्या बोर्ड परीक्षा ह्या विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने खूपच महत्त्वाच्या आहेत. यामुळे या बोर्ड परीक्षेत चांगले गुण मिळावेत यासाठी विद्यार्थी मोठी मेहनत घेत असतात.

यंदा देखील विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी मोठी मेहनत घेतली असून 10th आणि 12th ची परीक्षा दिली आहे. अशातच आता या परीक्षेचा रिझल्ट केव्हा डिक्लेअर होणार याबाबत बोर्डातील वरिष्ठ सूत्रांच्या माध्यमातून मोठे अपडेट समोर येत आहे.

केव्हा लागणार रिझल्ट ?

गेल्या काही वर्षांचा ट्रेंड पाहिला तर असे लक्षात येते की, आधी बारावीचा निकाल लागतो आणि त्यानंतर दहावीचा निकाल लागतो. गेल्या अनेक वर्षांपासून बारावीचा निकाल हा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जात आहे.

दुसरीकडे, दहावीचा निकाल हा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होतो. यंदा मात्र दहावी आणि बारावीचा निकाल याआधीच लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या इयत्ता दहावी इयत्ता बारावी बोर्ड एक्सामच्या उत्तर पत्रिकांची तपासणी सुरू आहे.

बोर्ड परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिकांची तपासणी युद्धपातळीवर सुरु आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत दोन्ही वर्गाच्या सर्वच विषयांच्या जवळपास ८५ टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत.

याचाच अर्थ यंदा दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. दुसरीकडे प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण यापूर्वीच शाळांनी ऑनलाइन पद्धतीने बोर्डाला पाठविले असल्याची माहिती समोर आली आहे.

यामुळे दरवर्षी दहावी आणि बारावीचे जें निकाल जूनच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात लागत होते ते निकाल यंदा लवकरच लागणार आहेत. बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, यंदा दोन्ही वर्गांचे निकाल ५ जूनपूर्वीच जाहीर होणार आहेत.

उत्तर पत्रिकांची तपासणी यंदा लवकर पूर्ण होणार असल्याने या दोन्ही वर्गांचे निकाल 5 जून 2024 पूर्वीच जाहीर केले जातील असा दावा केला जाऊ लागला आहे. तथापि, निकालाची तारीख अजूनही समोर आलेली नाही.

Leave a Comment