Heavy Rainfall : महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यात गेल्या 16 ते 17 दिवसांपासून पाऊस सुट्टीवर होता.
राज्यात कुठेच जोरदार पाऊस पडत नव्हता. काही भागात तर पावसाची रिमझिम देखील बंद होती. यामुळे खरीपातील पिके संकटात आली होती. पण गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे.
मात्र पावसाचा जोर हा खूपच कमी असून राज्यात केवळ रिमझिम पाऊस बरसत आहे. यामुळे खरीप हंगामातील उत्पादनाबाबत शेतकऱ्यांना शाश्वती राहिलेली नाही.तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
एकंदरीत महाराष्ट्रात आणि देशातील काही राज्यात पावसाची बिकट परिस्थिती आहे. अशातच मात्र एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे जगातील काही भागात जेवढा पाऊस संपूर्ण वर्षभरात पडतो तेवढा पाऊस एकाच दिवसात पडणार आहे. चक्रीवादळामुळे ही परिस्थिती तयार होणार आहे.
कुठे पडणार वर्षभराचा पाऊस एका दिवसात
मिळालेल्या माहितीनुसार उत्तरेकडे हिलेरी नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे. हे उत्तरेकडील आत्तापर्यंत आलेल्या मोठ्या चक्रीवादळांपैकी एक आहे. हे चक्रीवादळ येत्या काही दिवसात अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहराला धडकणार आहे.
सध्या हे चक्रीवादळ मेक्सिकोच्या दिशेने कुच करत असून हे चक्रीवादळ किनाऱ्यावर आदळल्यानंतर अमेरिकेतील कॅलिफोर्निया, एरिझोनो, नेवाडा या प्रांतात वर्षभरात जेवढा पाऊस पडतो तेवढा पाऊस एकाच दिवसात पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मेक्सिकोच्या बाजा कॅलिफोर्नियात पुढील दोन दिवसात दहा इंच पाऊस पडणार असा इशारा देण्यात आला आहे. मेक्सिको आणि कॅलिफोर्निया मध्ये या चक्रीवादळामुळे पूर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
यामुळे निसर्गाची ही माया कधी काय रूप दाखवेल सांगता येत नाही अस बोललं जात आहे. एकीकडे आपल्या महाराष्ट्रात पावसासाठी आभाळाकडे नजरा लागल्या आहेत तर दुसरीकडे अमेरिकेतील या प्रांतात एका दिवसात वर्षभरात जेवढा पाऊस पडतो तेवढा पडण्याची भीती व्यक्त होत आहे.