महाराष्ट्रात नागपंचमीला पडणार मोठा पाऊस; कोणत्या भागात पडणार, यंदा परतीचा पाऊस कसा राहणार ? पंजाबरावांनी सर्वच सांगितलं 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Update Panjabrao Dakh : पंजाबराव डख हे नाव महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय आहे. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये पंजाबरावांच्या कायमच चर्चा पाहायला मिळतात. पंजाबराव राज्यातील शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज देत असतात.

विशेष म्हणजे पंजाबरावांचा अंदाज तंतोतंत खरा ठरतो असे मत शेतकरी व्यक्त करतात. मात्र या चालू महिन्याबाबत त्यांनी वर्तवलेला हवामान अंदाज सुरुवातीला खरा ठरला नव्हता. त्यांनी ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला होता मात्र ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत खूपच कमी पाऊस पाहायला मिळाला आहे.

विशेष बाब म्हणजे ऑगस्ट महिन्यात सुरुवातीचे पंधरा दिवस राज्यात पावसाचा खंडच होता. राज्यातील काही भागात ऑगस्टचा पहिला पंधरवडा रिमझिम पाऊस देखील झाला नाही. आता गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.

राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात हलका पाऊस पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर बरसलेला हा पाऊस खरीप हंगामातील पिकांसाठी नवीन जीवदान देणारा सिद्ध होणार आहे. मात्र शेतकऱ्यांना जोरदार पावसाची आतुरता लागून आहे.

जुलै महिन्यात ज्याप्रमाणे मोठा पाऊस झाला तसा पाऊस या महिन्यातही पडला तर खरीप हंगामातील पिकांसाठी आणि रब्बी हंगामासाठी पाण्याची शाश्वत उपलब्धता होणार आहे. अशातच जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी राज्यात आता 20 ते 22 ऑगस्ट दरम्यान मोठा पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

शिवाय 25 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान जोरदार पाऊस होणार असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच राज्यात पाच ऑगस्टपर्यंत भाग बदलत पाऊस पडत राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा नागपंचमीला मोठा पाऊस पडणार आहे.

म्हणजे उद्या राज्यात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ समवेतच सर्वच विभागात आता पाच ऑगस्टपर्यंत भाग बदलत पाऊस होणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला असून यंदा महाराष्ट्रात परतीचा पाऊस चांगला बरसणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ज्या भागात आत्तापर्यंत सरासरी पेक्षाही कमी पाऊस असेल त्या भागात परतीचा पाऊस जास्त बरसणार असा अंदाज आहे. यावर्षी महाराष्ट्रातील सर्व धरणे 100% क्षमतेने भरतील, परतीचा पाऊस चांगला होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 

Leave a Comment