गुड न्यूज..! मुंबईला मिळणार आणखी एक वंदे भारत, कोणत्या मार्गावर धावणार ? पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली अपडेट 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Vande Bharat Train : मुंबईमधील जनतेला पश्चिम रेल्वे लवकरच एक मोठ गिफ्ट देणार आहे. ते म्हणजे मुंबईला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. पश्चिम रेल्वे विभाग ही एक्सप्रेस गाडी सुरू करणार आहे. खरंतर, महाराष्ट्रातून एकूण पाच वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत.

यातील चार गाड्या मुंबईहून धावत आहेत. मुंबईहून धावणाऱ्या या चार गाड्यांपैकी तीन गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून धावत आहेत. तर एक गाडी मुंबई सेंट्रल येथून धावत आहे. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर या मार्गावर पश्चिम रेल्वेची ही गाडी धावत आहे.

अशातच मात्र मुंबईकरांचा गुजरात कडील प्रवास आणखी जलद बनवण्यासाठी पश्चिम रेल्वे मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे याबाबतची चाचपणी देखील सुरू झाली आहे.

पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच एक महत्त्वाची बैठक घेतली होती. या बैठकीत या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी तयारी दाखवली आहे. दरम्यान याबद्दलचा मागणी प्रस्ताव तयार करून हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे आता मंजुरीसाठी पाठवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

खरंतर मुंबई सेंट्रल ते गांधीनगर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांमध्ये सुपरहिट ठरली आहे. या गाडीला प्रवाशांनी भरभरून असा प्रतिसाद दाखवला आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास गतिमान झाला आहे. खरंतर मुंबई ते अहमदाबाद रेल्वे मार्ग हा सर्वात व्यस्त रेल्वे मार्गांपैकी एक आहे.

या मार्गावर जवळपास वीस पेक्षा अधिक रेल्वे गाड्या धावत आहेत. विशेष म्हणजे या सर्व रेल्वे गाड्या हाऊसफुल राहतात. रोजाना तीस हजारापेक्षा अधिक प्रवासी या मार्गावर प्रवास करतात. अशा परिस्थितीत या मार्गावरील अन्य रेल्वे गाड्यांवरील ताण कमी करण्यासाठी आता मुंबई ते अहमदाबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा मानस पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार की नाही याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही मात्र पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी यासाठीचा मागणी प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवणार असे सांगितले आहे. यामुळे जर रेल्वे बोर्डाने या प्रस्तावावर सकारात्मकता दाखवली तर आगामी काही दिवसात या मार्गावर देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊ शकते.

Leave a Comment