झटपट होम लोन हवंय ? मग पटापटा ‘ही’ दोन कामे करा, कमी व्याज दरात मिळणार होम लोन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Loan : गेल्या काही वर्षांमध्ये घराच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. वाढत्या किमतीमुळे आता सर्वसामान्यांना घर घेणे मोठे कठीण होत आहे. यामुळे आपले स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण गृहकर्जाची मदत घेत आहेत.

जर तुम्हीही गृह कर्ज घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी अतिशय महत्त्वाची राहणार आहे. जसं की आपणास ठाऊक आहे की सर्व बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्था गृहकर्ज देतात.  घर खरेदी करण्यासाठी काही पैसे डाउन पेमेंट म्हणून द्यावे लागतात आणि बँक उर्वरित रक्कम विक्रेत्याला देते.

गृहकर्ज घेणारा कर्जदार कर्जाची रक्कम काही सुलभ हप्त्यांमध्ये परत करू शकतो. खरे तर गृह कर्ज हे सर्वसामान्यांसाठी फायद्याचे ठरते. यामुळे सर्वसामान्यांची स्थावर मालमत्ता तयार होत असते. पण गृहकर्ज घेताना अनेकांना काही समस्या भेडसावतात.

अनेकदा बँक होम लोन मंजूर करण्यासाठी अधिकचा कालावधी घेते. यामुळे अनेकांच्या माध्यमातून लवकरात लवकर आणि स्वस्त व्याजदरात कर्ज मिळवण्यासाठी काय केले पाहिजे हा प्रश्न उपस्थित केला जात होता.

दरम्यान आज आपण अशा प्रकारचे कर्ज लवकरात लवकर मिळावे यासाठी काय केले जाऊ शकते याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. वास्तविक, जे व्यक्ती कोणत्याही तयारीशिवाय गृहकर्जासाठी अर्ज करतात अशांचे कर्ज लवकर मंजूर होत नाही. गृहकर्ज देताना बँका तुमची चौकशी करतात.

तुमचा क्रेडिट स्कोअर आणि तुमचे उत्पन्न याची सुद्धा पडताळणी केली जाते. यामध्ये जर काही अडचण असेल तर गृह कर्ज नामंजूर सुद्धा होऊ शकते. यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत, ज्याचे पालन करून तुम्हीही गृहकर्ज मंजूर करण्यासाठी लागणारा वेळ कमी करू शकता.

सिबिल स्कोर सुधारा : गृहकर्जाच्या त्वरित मंजुरीसाठी, तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे. तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी तुमची सर्व पेमेंट वेळेवर करा. जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर ते लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न करा.

एवढेच नाही तर तुमचा क्रेडिट रिपोर्ट वेळोवेळी तपासत राहा आणि त्यात काही चूक असल्यास ती दुरुस्त करा. चांगला क्रेडिट स्कोअर राहिला तर तुम्हाला कर्ज लवकर मिळण्यास मदत होईलच, पण तुम्हाला कमी व्याजही द्यावे लागेल.

योग्य बँक निवडा : गृहकर्ज देण्यासाठी सर्व बँकांचे स्वतःचे निकष आहेत. केवळ प्रक्रिया शुल्क आणि व्याजदर वेगळे नाहीत, काही बँका मंजुरीसाठी कमी आणि काही जास्त वेळ घेतात, काही बँका कर्जाच्या अर्जाची अधिक चौकशी करतात आणि काही कमी करतात.

म्हणूनच कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही अर्ज करत असलेल्या बँकेची माहिती जाणून घ्या. बँक कर्ज मंजुरीसाठी किती वेळ लावते ? तसेच कर्ज देण्याचे नियम कडक आहेत का तेही तपासा.

Leave a Comment