Income Tax Rule : आजची ही बातमी नोकरदार वर्गासाठी विशेष कामाची ठरणार आहे. जर तुम्हीही एखाद्या कंपनीत नोकरीला असाल तर तुम्हाला आयकर भरावा लागणार आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करावा लागणार आहे.
यासाठी कंपनीकडून तुम्हाला फॉर्म 16 दिला जात असतो. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 उपलब्ध करून दिला आहे. जर तुम्हालाही हा फॉर्म मिळाला असेल तर तुम्हाला लवकरात लवकर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचे आहे.
दरम्यान, अनेकांच्या माध्यमातून किती पगार असलेल्या लोकांना किती इन्कम टॅक्स द्यावा लागतो याविषयी प्रश्न उपस्थित केला जात होता. यामुळे आज आपण मंथली पन्नास हजार रुपये पगार असलेल्या लोकांना किती आयकर भरावा लागतो याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की नोकरदार वर्गाला दोन पद्धतीने आयटीआर भरता येतो. जुनी रिजीम आणि नवीन रिजीम निवडून ITR भरता येतो. आता आपण या दोन्ही पद्धती थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
50 हजार पगार असलेल्या लोकांना किती टॅक्स द्यावा लागतो
जुन्या रिजीमनुसार, जर तुमचा पगार दरमहा ५० हजार रुपये म्हणजे वार्षिक ६ लाख रुपये एवढा असेल आणि तुम्ही कोठेही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केलेली नसेल तर तुम्हाला फक्त 50 हजार रुपयांचा स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ मिळणार आहे.
अशा परिस्थितीत, तुमच्या एकूण 6 लाख रुपयांच्या उत्पन्नामधून साडेपाच लाख रुपयांचे उत्पन्न करपात्र समजले जाणार आहे. या उत्पन्नावर तुम्हाला 23,400 रुपये कर भरावा लागणार आहे. पण जर तुम्ही SSY, SCSS, PPF, NPS, FD, जीवन विमा इत्यादी कर बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुमची वार्षिक 1.50 लाख रुपयांची रक्कम टॅक्स फ्री राहणार आहे. तसेच 50,000 स्टॅंडर्ड डिडक्शन चा लाभ मिळणार आहे.
अशा तऱ्हेने तुमच्या एकूण सहा लाख रुपयांच्या उत्पन्नामधून चार लाख रुपयांचे उत्पन्न कर पात्र ठरवले जाणार आहे. या चार लाख रुपयांच्या उत्पन्नावर मात्र तुम्हाला कोणताच टॅक्स द्यावा लागणार नाही. दुसरीकडे, नवीन टॅक्स रिजीमनुसार, 50 हजार रुपये पगार असलेल्या लोकांनी आयटीआर फाइल केल्यास कोणताही आयकर भरावा लागणार नाही.
वास्तविक, नवीन कर प्रणालीमध्ये फक्त 50 हजार रुपयांची मानक वजावट उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रकरणात, तुमचे वार्षिक करपात्र उत्पन्न 5.50 लाख रुपये एवढे राहणार आहे. पण नवीन कर प्रणाली मध्ये एवढ्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नाही.