Income Tax File : भारतीय आयकर विभाग आयकरास पात्र असलेल्या व्यक्तींकडून आयकर वसूल करत असते. ज्या लोकांचे उत्पन्न हे करपात्र असते त्यांनाच कर भरावा लागतो. म्हणजेच सर्वसामान्य गरीब जनतेला आयकर भरावा लागत नाही. कराची रक्कम ही व्यक्तीच्या उत्पन्नावरून ठरत असते.
जेवढे अधिक उत्पन्न तेवढा जास्त कर सदर व्यक्तीला भरावा लागतो. ज्या व्यक्ती कर पात्र असूनही कर भरत नाहीत किंवा कर चोरी करतात त्यांच्यावर आयकर विभागाच्या माध्यमातून कठोर कारवाई केली जात असते.
त्यामुळे करपात्र लोकांना कर चुकवू नये आणि वेळेवर कर भरावा असे आवाहन केले जाते. दरम्यान आज आपण आयकर संदर्भातील एक अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ज्या लोकांना वार्षिक दहा लाख रुपयांचा पगार आहे अशा लोकांना किती टॅक्स भरावा लागतो ? नवीन टॅक्स रिजीम नुसार सदर व्यक्तींना किती टॅक्स द्यावा लागू शकतो याविषयी आज आपण बहुमूल्य माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
वार्षिक 10 लाख रुपयांचा पगार असेल तर किती रुपये टॅक्स द्यावा लागतो ?
नवीन टॅक्स रिजीमनुसार, सात लाख रुपयांची रक्कम ही टॅक्स फ्रि करण्यात आली आहे. म्हणजे ज्या लोकांची कमाई सात लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्यांना कोणताच टॅक्स द्यावा लागणार नाही. मात्र सात लाख रुपयांपेक्षा जास्तीची कमाई असल्यास टॅक्स भरावा लागू शकतो.
अर्थातच ज्या लोकांची वार्षिक कमाई दहा लाख रुपयांची आहे अशा लोकांना टॅक्स भरावा लागणार आहे. नवीन टॅक्स रिजीमनुसार म्हणजे नवीन कर प्रणालीमध्ये 50,000 रुपयांची मानक वजावट दिली जात आहे.
एकंदरीत 50 हजार रुपयांची मानक वजावट आणि सात लाख रुपयांचे उत्पन्न टॅक्स फ्री असल्याने नवीन कर प्रणाली मध्ये साडेसात लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताच टॅक्स लागणार नाही.
मात्र नवीन कर प्रणालीमध्ये जुन्या कर प्रणाली सारखी इतर कोणती सूट आयकरदात्याला मिळत नाही. अशा तऱ्हेने जर तुमचे वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपयांचे असेल तर तुमची अडीच लाख रुपयांची कमाई ही आयकरसाठी पात्र ठरणार आहे.
तुम्हाला अडीच लाख रुपयांवर कर भरावा लागणार आहे. यानुसार नवीन कर प्रणाली मध्ये दहा लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तीला एज्युकेशन सेस पकडून 27 हजार रुपयांचा टॅक्स द्यावा लागू शकतो.