India Famous Tourist Destination : ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाली आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच काही लोकांना दोन दिवसांच्या सुट्ट्या मिळाल्या आहेत. दरम्यान ऑक्टोबर महिन्यात पुढे देखील खूप सुट्ट्या राहणार आहेत. सणासुदीमुळे ऑक्टोबर महिन्यातील सुट्ट्यांची संख्या वाढली आहे.
यामुळे अनेक लोक आता ऑक्टोबरमध्ये फिरायचा प्लॅन करणार आहेत. तर काही फिरायला देखील गेले आहेत. जर तुम्हीही ऑक्टोबर मधील सुट्ट्यांचा लाभ घेण्याचा विचारात असाल आणि फिरायला जायचा प्लॅन आखत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. आज आपण ऑक्टोबर मध्ये फिरण्यासारख्या काही महत्वाच्या आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळांबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
ऑक्टोबरमध्ये फिरण्यासारखी ठिकाणे
हंपी : खरंतर ऑक्टोबर महिना फिरायला जाण्यासाठी खूपच खास असतो. कारण की ऑक्टोबर हा संक्रमणाचा महिना असतो. या महिन्यात पावसाळा संपतो आणि हिवाळ्याला सुरुवात होते. यामुळे मात्र वातावरणात उकाडा वाढतो. अशा स्थितीत ऑक्टोबरच्या महिन्यात विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या जातात.
जर तुम्हीही या महिन्यात फिरण्यासाठी जाणार असाल तर तुम्ही हम्पी या कर्नाटकातील प्रसिद्ध पर्यटन स्थळाला भेट देऊ शकता. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये या शहराचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे जर आपणास वर्ल्ड हेरिटेज बघायचे असेल तर इथेच नक्कीच भेट द्या. हे शहर प्राचीन मंदिरे, स्मारके आणि अखंड रचनांसाठी विशेष लोकप्रिय आहे. येथे जगभरातील पर्यटक वर्षभर भेटी देतात.
ताजमहाल : जगातील सात आश्चर्यांमध्ये ताजमहालाचा समावेश होतो. यमुना नदीच्या काठावर बांधलेल्या या वास्तूची भुरळ भल्याभल्यांना पडली आहे. या वास्तूचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक राजधानी दिल्ली येथे भेट देतात. यामुळे तुम्ही प्रवासाचा जर नियोजन करत असाल तर तुमच्या यादीत ताजमहालचे नाव असायलाच हवं.
जर तुम्ही ताजमहाल पाहण्यासाठी गेलात तर दिल्लीमधील आग्रा किल्ला, जामा मशीद, मेहताब बाग, अकबराचा मकबरा (सिकंदरा), फतेहपूर सिक्रीलाही अवश्य भेट दिली पाहिजे. या ठिकाणाला भेट दिली नाही तर तुमचा दिल्ली ट्रिप पूर्ण होणार नाही.
कोलकाता : ऑक्टोबर महिन्यात नवरात्र उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जाणार आहे. खरं तर या उत्सवाची धूम संपूर्ण देशभरात पाहायला मिळेल. मात्र बंगालमधील नवरात्र उत्सवाची बातच काही न्यारी आहे. यामुळे जर तुम्ही ऑक्टोबर मध्ये फिरायला निघणार असाल तर तुम्ही कोलकत्याला एकदा भेट द्या.
कोलकातामध्ये या महिन्यांमध्ये दुर्गापूजा मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. तसेच तुम्ही कोलकत्याला गेला तर तिथे निक्को पार्क, व्हिक्टोरिया मेमोरियल, कालीघाटातील कालका मंदिर आणि बेलूर मठ यासारख्या ठिकाणांनाही भेट देऊ शकता.