महाराष्ट्राच्या हवामानात अचानक झाला मोठा बदल ! ‘या’ तारखेपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस होणार, हवामान खात्याचा गंभीर इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Havaman Andaj : यंदा ऑगस्टमध्ये गेल्या शंभर वर्षांच्या काळात जें घडलं नव्हतं ते घडलं. संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा केला. पावसाने सरासरी देखील गाठली नाही. याचा परिणाम म्हणून राज्यावर पाणी संकट ओढावले होते. अनेक भागातील शेती पिके कोमेजू लागली होती. काही ठिकाणी तर शेती पिके पार करपलीत.

यामुळे यावर्षी संपूर्ण खरीप हंगाम वाया जाईल आणि पिण्याचे पाण्याचे देखील संकट उभे राहिले असे सांगितले जात होते. मात्र असे काही घडले नाही सप्टेंबर महिन्याची सुरुवात पावसाने झाली. तसेच गणेशोत्सवाच्या काळात पावसाचा जोर वाढला. यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला.

19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान यावर्षी गणेशोत्सव साजरा केला गेला आणि या कालावधीत राज्यात सर्व दूर मुसळधार पावसाची हजेरी लागली. गणपती बाप्पाच्या निरोपाला देखील पाऊस मनसोक्त बरसला. गणरायाच्या आगमना बरोबर दाखल झालेला पाऊस अजूनही सुरु आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील ठराविक भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस सुरु आहे. काल अर्थातच 1 ऑक्टोबर रविवारी राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळाली. काल दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यात खूप मोठा पाऊस झाला आहे.

दरम्यान आगामी काही तास महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. आय एम डी ने येत्या 48 तासात राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

तसेच पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यांना येलोर देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांमधील नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला यावेळी तज्ञ लोकांकडून दिला जात आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या पिकाची काळजी घ्यावी असे देखील आवाहन करण्यात आले आहे. एकंदरीत मान्सूनची सुरुवात चांगली झाली नसली तरी देखील मान्सूनचा शेवट मात्र दमदार पाऊसाने होण्याची शक्यता आहे. 

Leave a Comment