India New Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते विकासात मोठे काम झाले आहे. विविध महामार्गांची राज्यात पायाभरणी करण्यात आली आहे. काही महामार्गाची कामे पूर्ण होत आली आहेत. समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. समृद्धी महामार्ग हा राज्यातील सध्या स्थितीला सर्वात लांबीचा मार्ग म्हणून ओळखला जात आहे. मुंबई ते नागपूर या दोन राजधान्यांना जोडणारा हा महामार्ग एकूण 701 किलोमीटर लांबीचा आहे.
या महामार्गाला हिंदुरुदय सम्राट समृद्धी महामार्ग म्हणून ओळखले जात आहे. सध्या स्थितीला या मार्गाचे सहाशे किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. नागपूर ते भरवीर पर्यंतचे काम पूर्ण झाले असून यावर वाहतूक देखील सुरू आहे. विशेष म्हणजे भरवीर ते मुंबई पर्यंतचे काम देखील जलद गतीने सुरुवात लवकरात लवकर हे काम पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हे काम पूर्ण केले जात आहे.
या मार्गाचे डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण काम पूर्ण होईल आणि त्यानंतर नवीन वर्षात हा महामार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे. हा मार्ग अंतिम टप्प्यात आला असतानाच महाराष्ट्रात आणखी एक महामार्गाची पायाभरणी केली जाणार आहे. नागपूर ते गोवा दरम्यान शक्तीपीठ महामार्ग विकसित होणार आहे. हा महामार्ग समृद्धी महामार्गापेक्षा अधिक लांब राहणार आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर उत्तर प्रदेश मध्येही विविध महामार्गाची कामे हाती घेण्यात आली आहेत.
अशातच आता उत्तर प्रदेश राज्यात राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग तयार केला जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. सध्या स्थितीला उत्तर प्रदेश मध्ये पूर्वांचल एक्सप्रेस वे हा तेथील सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जातो. मात्र गंगा एक्सप्रेस वे अर्थातच मेरठ ते प्रयागराज दरम्यान विकसित होणाऱ्या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग पूर्वांचल महामार्गापेक्षा सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जाईल.
मात्र आता गंगा एक्सप्रेस वे पेक्षाही लांब महामार्गाची उभारणी उत्तर प्रदेश मध्ये होणार आहे. गोरखपूर ते शामली दरम्यान हा नवीन एक्स्प्रेस वे तयार केला जाणार आहे. या महामार्गाची 700 किलोमीटर एवढी लांबी राहणार आहे. यासाठी जवळपास 35 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विशेष म्हणजे या मार्गाची पायाभरणी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुककांपूर्वीच होणार आहे.
या द्रुतगती महामार्गाचा रूटमॅप देखील तयार करण्यात आला आहे. नुकतेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या एक्स्प्रेस वेच्या बांधकामाला मंजुरी दिली जाईल, असे सांगितले आहे. गोरखपूर-शामली एक्स्प्रेस वे उत्तरप्रदेश राज्यातील २२ जिल्हे आणि ३७ तालुक्यांमधून जाणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हा एक्सप्रेस वे बांधणार आहे.
एनएचएआयने आपल्या स्तरावर ही योजना राबविण्याची तयारी सुरू केली आहे. हा एक सहा पदरी महामार्ग राहणार आहे. हा मार्ग भारत-नेपाल सीमेच्या जवळच तयार होणार आहे. या महामार्गावर हवाई पट्टी बांधण्याचीही योजना आहे. या हवाई पट्टीवर जेट विमाने उतरवण्याची सुविधा असेल अशी माहिती समोर येत आहे. निश्चितच या महामार्गामुळे उत्तर प्रदेश राज्याचा सर्वांगीण विकास सुनिश्चित होणार आहे. यामुळे तेथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होणार आहे.