अखेर पिवळं सोन चमकलं ! सोयाबीन बाजारभावात मोठी वाढ, कुठं मिळाला विक्रमी भाव, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean Price Hike : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. याच्या विक्रीतून शेतकऱ्यांना तात्काळ पैसा मिळतो यामुळे याला नगदी पीक म्हणून ओळखले जाते. शेतकरी बांधव याला पिवळं सोनं म्हणून ओळखतात. गेल्या काही वर्षांमध्ये मात्र सोयाबीनची शेती देखील शेतकऱ्यांसाठी एक डोकेदुखीच ठरत आहे.

याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सोयाबीनची एकरी उत्पादकता दिवसेंदिवस कमी होत आहे. येलो मोझॅक तसेच विविध किडी आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे  सोयाबीनचे उत्पादन कमी होत आहे. विशेष म्हणजे सोयाबीनला गेल्या हंगामापासून अपेक्षित असा भावही मिळत नाहीये.

यंदा देखील कमी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होणार असा अंदाज आहे. परंतु अजूनही सोयाबीनचे बाजार भाव दबावातच आहेत. यामुळे या पिकासाठी आलेला खर्च देखील भरून निघणार नसल्याचे चित्र तयार होत आहे. सोयाबीनला राज्यातील अनेक बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र आता काही बाजारांमध्ये सोयाबीनचे दर थोडेसे वाढले आहेत.

अखेर कार पिवळं सोन आता पुन्हा कडाडले आहे. सोयाबीनचे बाजारभाव आता 5000 प्लस झाले आहेत. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळत आहे. सोयाबीनचे आगार म्हणून ख्यातीप्राप्त असलेल्या विदर्भातील अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल सोयाबीनच्या बाजारभावात 100 रुपये प्रति क्विंटल ते 125 रुपये प्रतिक्विंटल पर्यंतची वाढ नमूद करण्यात आली आहे.

काल अकोला एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4925 रुपये एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून सरासरी बाजार भाव 4700 रुपये नमूद करण्यात आला आहे. आज देखील राज्यातील तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन बाजारभावात सुधारणा पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, आज 31 ऑक्टोबर रोजी तासगाव कृषी उत्पन्न बाजार संमितीमध्ये 21 क्विंटल सोयाबीन आवक झाली होती. या APMC मध्ये आज सोयाबीनला किमान 4860, कमाल 5090 आणि सरासरी 4960 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.

तसेच चिखली APMC मध्ये आज 31 ऑक्टोबर रोजी 2720 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली आहे. आज या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 4300, कमाल 5026 आणि सरासरी 4663 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे. पण सोयाबीनला किमान 6 हजाराचा सरासरी भाव मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे.

Leave a Comment