आताची सर्वात मोठी बातमी ! महाराष्ट्रातील पुणे, नाशिकसह ‘या’ 15 जिल्ह्यात दुष्काळ जाहीर, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा, तालुकानिहाय यादी पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये शिंदे सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. खरंतर यावर्षी मान्सून काळात महाराष्ट्रात खूपच कमी पाऊस बरसला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात यावर्षी फक्त 88% एवढा पाऊस झाला आहे. म्हणजेच सरासरीच्या तुलनेत जवळपास 12% कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

हवामान खात्यानेच याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये यंदा दुष्काळाची झळ पाहायला मिळत आहे. दुष्काळामुळे राज्यातील अनेक भागांमधील शेती पिके संकटात आली होती. यामुळे सोयाबीन, कापूस समवेतच सर्वच खरीपातील पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. काही ठिकाणी तर पेरणी केलेले पीक पूर्णपणे वाया गेले आहे.

पेरलेले उगवले नाही. ज्या भागात उगले त्या ठिकाणी पिकांची पूर्णपणे वाढ झाली नाही. यामुळे पेरणीसाठी केलेला हजारो रुपयांचा खर्च आणि शेतकऱ्यांची मेहनत पूर्णपणे पाण्याअभावी पाण्यात गेली आहे. राज्यातील जवळपास बारा जिल्ह्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी आणि 15 जिल्ह्यांमध्ये 70% पेक्षा कमी पाऊस आहे. याचा परिणाम म्हणून अनेक भागात नजीकच्या काळात पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न अहिराणीवर येण्याची शक्यता आहे.

यामुळे गुराढोरांसाठी चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण होणार आहे. परिस्थिती एवढी बिकट आहे की राज्यातील जवळपास 2000 गावे ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. त्यामुळे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात या संबंधित भागांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी मोठी वणवण राहणार आहे.

या परिस्थितीवरून महाराष्ट्रातील दुष्काळाची दाहकता स्पष्ट होत आहे. हेच कारण आहे की राज्यात गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत होती. यासाठी शासनाकडे मोठा पाठपुरावा सुरू होता. विविध शेतकरी संघटनांनी शिंदे सरकारकडे महाराष्ट्रात लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली होती. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना देखील याबाबत सातत्याने विचारणा केली जात होती.

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी मुंडे यांनी दुष्काळाबाबत शासनाकडून लवकर सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार काल अर्थातच 31 ऑक्टोबर 2023 रोजी शिंदे सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून राज्यातील 15 जिल्ह्यांमधील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. राज्य शासनाने 15 जिल्ह्यांमधील 24 तालुक्यांमध्ये गंभीर तर उर्वरित सोळा तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणत्या जिल्ह्यात जाहीर झाला दुष्काळ ?

जालना : जिल्ह्यातील भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मंठा या पाच तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाच्या दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव या दोन जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे.

पुणे : पुरंदर सासवड आणि बारामती या तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे. शिरूर घोडनदी, दौंड आणि इंदापूर या तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे. 

नाशिक : मालेगाव, सिन्नर आणि येवला या तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

बीड : वडवणी, धारूर आणि आंबेजोगाई या तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

लातूर : रेनापुर तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर झाला आहे.

धाराशिव : वाशी, धाराशिव आणि लोहारा या तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

सोलापूर : बार्शी, माळशिरस आणि सांगोला या तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळ जाहीर झाला आहे. करमाळा आणि माढा या तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर झाला आहे.

कोल्हापूर : हातकणंगले आणि गडहिंग्लज या तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर झाला आहे. 

सांगली : शिराळा, कडेगाव, खानापूर विटा आणि मिरज या तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर झाला आहे.

सातारा : वाई आणि खंडाळा या तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर झाला आहे.

नंदुरबार : नंदुरबार तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

धुळे : सिंदखेडा तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

जळगाव : चाळीसगाव तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

बुलढाणा : बुलढाणा आणि लोणार या दोन तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे.

Leave a Comment