कमी गुंतवणुकीत मिळेल बक्कळ नफा; सुरू करा ‘हा’ नव्या युगातील बिजनेस, मिळणार लाखोंचे उत्पन्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Low Investment Business : 21 व शतक हे कम्प्युटर युग म्हणून ओळखले जाते. लॅपटॉप, कम्प्युटर आणि स्मार्टफोनमुळे हे युग अधिक वेगाने प्रगती करत आहे. संगणकाच्या शोधामुळे खऱ्या अर्थाने विकासाला चालना मिळाली आहे. आता प्रत्येक क्षेत्रात कम्प्युटर आणि लॅपटॉपचा उपयोग होऊ लागला आहे. आपल्या देशातील जवळपास प्रत्येक घरात कंप्यूटर आणि लॅपटॉपचा वापर पाहायला मिळतं आहे.

हेच कारण आहे की, कम्प्युटर आणि लॅपटॉपचे देशातील मार्केट गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बूम झाले आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही कम्प्युटर आणि लॅपटॉपच्या मार्केटचा उपयोग करू शकणार आहात. खरंतर कम्प्युटर आणि लॅपटॉपचा वापर वाढला असल्याने याच्या रिपेरिंगसाठी देखील मोठ्या प्रमाणात स्कोप तयार झाला आहे.

त्यामुळे जर तुम्हाला एखादा छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही कम्प्युटर किंवा लॅपटॉप रिपेरिंगचा व्यवसाय सुरू करू शकणार आहात. विशेष म्हणजे हा व्यवसाय खूपच कमी गुंतवणुकीत सुरू होऊ शकतो आणि यातून लाखो रुपयांची कमाई होऊ शकते. यासाठी तुम्हाला मात्र कम्प्युटर आणि लॅपटॉप रिपेरिंग येणे आवश्यक आहे. जर तुम्हाला कंप्यूटर आणि लॅपटॉप रिपेरिंगचे ज्ञान नसेल तर तुम्ही हे कौशल्य शिकू शकता.

ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून तुम्ही हे प्रशिक्षण घेऊ शकता किंवा तुमच्या जवळ असलेल्या प्रशिक्षण केंद्रात लॅपटॉप किंवा कम्प्युटर रिपेरिंग प्रशिक्षण घेऊ शकता. खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशातील नागरिकांचा माईंडसेट थोडासा चेंज झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता नोकरी ऐवजी व्यवसायाला प्राधान्य दिले जात आहे.

त्यामुळे जर तुम्ही नोकरीऐवजी व्यवसाय करण्याच्या तयारीत असाल मात्र कोणता व्यवसाय सुरू करावा हे सुचत नसेल तर तुम्ही कम्प्युटर किंवा लॅपटॉप रिपेरिंगचा व्यवसाय सुरू करू शकतात. जर तुमच्याकडे कमी भांडवल असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान आता आपण या व्यवसायाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

कम्प्युटर, लॅपटॉप रिपेरिंग प्रशिक्षण कुठे घेणार?

तुम्ही संगणक प्रशिक्षण केंद्रात जाऊन कम्प्युटर लॅपटॉप रिपेरिंग प्रशिक्षण घेऊ शकणार आहात. जर तुम्हाला घरूनच हे प्रशिक्षण घ्यायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन देखील हे प्रशिक्षण घेऊ शकता. CNet.com आणि ZDN.com सारख्या ऑनलाइन प्रशिक्षण देणाऱ्या वेबसाईटवर तुम्ही याबाबतचे प्रशिक्षण ऑनलाईन मिळवू शकणार आहात.

तुम्ही युट्युब वर देखील याचे प्रशिक्षण घेऊ शकता. युट्युब वर अनेक व्हिडिओज आहेत ज्याद्वारे तुम्ही हे प्रशिक्षण पूर्ण करू शकता. परंतु जर तुम्हाला कम्प्युटर आणि लॅपटॉप रिपेरिंग चे संपूर्ण कौशल्य अवगत करायचे असेल तर तुम्ही तज्ञ लोकांकडून याचे प्रशिक्षण घेतले पाहिजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या व्यवसायात कोणतीच अडचण भासणार नाही.

व्यवसाय कसा सुरू करणार

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमच्या शहरातील बाजारपेठेत दुकान सुरू करावे लागणार आहे. तुम्ही हा व्यवसाय घरातूनही सुरू करू शकता मात्र बाजारपेठेत जर हा व्यवसाय सुरू केला तर तुमच्या व्यवसायाला चांगला बूस्ट मिळणार आहे. यासाठी तुम्हाला बाजारपेठेत एक गाळा भाड्याने घ्यावा लागणार आहे. तुम्हाला तुमच्या दुकानात कम्प्युटर आणि लॅपटॉपच्या काही ॲक्सेसरीज देखील ठेवाव्या लागणार आहेत.

तुम्ही लॅपटॉप आणि कम्प्युटर विक्री देखील करू शकता. नवीन किंवा सेकंड हॅन्ड लॅपटॉप आणि कम्प्युटर विक्री आणि रिपेरिंग असा तुमचा नवीन व्यवसाय तुम्ही सुरू करू शकणार आहात. यासाठी सुरुवातीला तुम्हाला पाच लाखांपर्यंतची गुंतवणूक मात्र करावी लागणार आहे.

मदर बोर्ड, सीपीयू (प्रोसेसर), रॅम (मेमरी), हार्ड ड्राइव्ह (आयडीई आणि एसएएस), व्हिडिओ कार्ड, साउंड कार्ड आणि नेटवर्क कार्ड इ. ॲक्सेसरीज देखील तुम्हाला तुमच्या दुकानात ठेवाव्या लागणार आहेत. यासोबतच तुम्ही मोबाईल रिपेरिंग देखील करू शकता तसेच मोबाईल ॲक्सेसरीजचा व्यवसाय देखील याच्या जोडीने चालवला जाऊ शकतो.

किती कमाई होणार

तुमच्या व्यवसायाची लोकप्रियता वाढवली तरी या व्यवसायातून दिवसाला 3000 पर्यंतची कमाई होऊ शकते. म्हणजेच महिन्याकाठी 90,000 पर्यंतची कमाई तुम्हाला या व्यवसायातून सहजतेने होऊ शकते. मात्र कमाई ही सर्वस्वी तुमचा व्यवसाय कसा चालतो यावर अवलंबून राहणार आहे. जर तुमचा व्यवसाय चांगला चालला तर यातून तुम्हाला निश्चितच चांगले उत्पन्न मिळणार आहे.

Leave a Comment