India New Expressway : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्ग तयार झाले आहेत. आपल्या राज्यातही नवनवीन महामार्ग तयार होत आहेत. आतापर्यंत अनेक महामार्गाची कामे पूर्ण झाली असून भविष्यात आणखी काही नवीन महामार्गाची कामे सुरू होणार आहे. महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यात मुंबई ते नागपूर दरम्यान समृद्धी महामार्ग तयार केला जात आहे.
याचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. दुसरीकडे बुधवारी अर्थातच 7 फेब्रुवारी 2024 ला महाराष्ट्र राज्य शासनाने नागपूर ते गोवा दरम्यान तयार होत असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या अंतिम आखणीला मान्यता दिली आहे. यामुळे आता या मार्गाचे काम देखील सुरू होणार आहे.
शिवाय मुंबई ते दिल्ली दरम्यान नवीन महामार्ग तयार होत आहे. या मार्गामुळे मुंबई ते दिल्ली हा प्रवास फक्त आणि फक्त बारा तासात पूर्ण होऊ शकणार आहे. एवढेच नाही तर आता विदेशात देखील रस्ते मार्गाने जाता येणार आहे. मोदी सरकारने यासाठी एक नवीन महामार्ग प्रस्तावित केला आहे.
हा महामार्ग भारत-म्यानमार-थायलंड या तीन देशात तयार होत आहे. याला IMT हायवे म्हणून ओळखले जात आहे. हा एक चार पदरी महामार्ग राहणार आहे. भारतातील आसाम राज्यातील मोरेह येथून या महामार्गाची सुरुवात होणार असून पुढे म्यानमार मार्गे थायलंडमधील माई सोत इथपर्यंत चार पदरी मार्ग तयार होणार आहे.
या प्रकल्पाचे काम लुक ईस्ट पॉलिसी अंतर्गत पूर्ण होणार आहे.यामुळे उद्योग, शिक्षण आणि पर्यटन क्षेत्राला मोठा हातभार लागणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय राजधानी दिल्ली किंवा आर्थिक राजधानी मुंबई येथून थेट थायलंडला रस्ते मार्गाने जाता येणे शक्य होणार आहे.
त्यामुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असून भारताच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे.या कोलकत्ता-बँकॉक महामार्गाची एकूण लांबी 1360 किलोमीटर एवढी राहील. या मार्गाचा बहुतांशी भाग हा आपल्या भारतात राहणार आहे.
तर थायलंडमध्ये या मार्गाचा खूपच कमी भाग राहील. या मार्गाचे काम भारतात आणि थायलंडमध्ये जवळपास पूर्ण झाले असून म्यानमार मध्ये युद्ध पातळीवर काम सुरू आहे. हाती आलेल्या माहितीनुसार हा महत्त्वाकांक्षी हायवे पश्चिम बंगालमधील कोलकत्ता येथून सुरू होतो आणि उत्तरेला सिलीगुडीपर्यंत जात आहे.
पुढे कूचबिहारमार्गे ते बंगालमधून श्रीरामपूर सीमेवरून आसाममध्ये प्रवेश करणार आहे. पुढे दिमापूरहून नागालँडमध्ये प्रवेश करेल. मणिपूरमधील इंफाळजवळील मोरेह नावाच्या ठिकाणी हा महामार्ग म्यानमारमध्ये प्रवेश करत आहे.
म्यानमारच्या मंडाले, नेपीडाव, बागो, यंगून आणि म्यावाड्डी शहरांमधून माई सॉट मार्गे थायलंडमध्ये प्रवेश करत आहे. विशेष म्हणजे भविष्यात कंबोडिया, लाओसं आणि व्हिएतनाम या देशांना देखील रस्ते मार्गाने जोडण्याची भारताची योजना आहे. विशेष म्हणजे सध्या सुरू असलेल्या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन मोटर नियम तयार केले जाणार आहेत.
या अंतर्गत या दोन्ही देशांमध्ये भारतीय प्रवाशांना जाता येणार आहे. यासाठी विशेष लायसन्स जारी केले जाईल असा दावा केला जात आहे. निश्चितच हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर रस्ते मार्गाने बँकॉक पर्यंत जाता येणे शक्य होणार असल्याने पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे हा मार्ग केव्हा पूर्ण होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.