गुड न्यूज ! महाराष्ट्रात तयार होणार आतापर्यंतचा सर्वाधिक लांबीचा महामार्ग, राज्य शासनाची मंजुरी, कसा असेल रूट?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Longest Highway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध विकास कामें पूर्णत्वास गेली आहेत. यामध्ये अनेक रस्ते विकासाच्या कामांचा देखील समावेश होता. राज्यात गेल्या काही वर्षात अनेक महत्त्वाच्या महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत.

विशेष म्हणजे अजूनही काही महामार्गाची कामे सुरूच आहेत. तर काही महामार्गांची कामे ही सुरू होणार आहेत. सध्या राज्यात समृद्धी महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रात विकसित होत असलेला एक महत्त्वाचा महामार्ग आहे.

हा मार्ग अंशतः सुरू देखील झाला आहे. समृद्धी महामार्ग मुंबई ते उपराजधानी नागपूर दरम्यान विकसित केला जात आहे. हा 701 किलोमीटर लांबीचा मार्ग असून आत्तापर्यंत समृद्धी महामार्गाचा सहाशे किलोमीटरचा टप्पा सर्वसामान्यांसाठी सुरू झाला आहे.

नागपूर ते भरवीर असा समृद्धी महामार्गाचा 600 km चा टप्पा वाहतुकीसाठी सुरू आहे. विशेष म्हणजे येत्या काही महिन्यात संपूर्ण समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबई ते नागपूर आणि नागपूर ते मुंबई हा प्रवास जलद होणार अशी आशा व्यक्त होत आहे.

अशातच आता महाराष्ट्रासाठी आणखी एक आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रात आत्तापर्यंतचा सर्वाधिक लांबीचा महामार्ग लवकरच विकसित होणार आहे. राज्यात समृद्धी महामार्गापेक्षा अधिक लांबीचा महामार्ग तयार होणार आहे.

नागपूर ते गोवा दरम्यान शक्तीपीठ महामार्ग विकसित होणार आहे. हा 805 किलोमीटर लांबीचा महामार्ग राहणार असून या मार्गाच्या अंतिम आराखड्याला शासनाने बुधवारी म्हणजेच 7 फेब्रुवारी 2024 ला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता शक्तिपीठ महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार अशी आशा व्यक्त होत आहे.

कसा राहील मार्ग

हा 805 किलोमीटर लांबीचा मार्ग वर्धा येथील पवनार येथून सुरु होईल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी येथे संपणार आहे. हा महामार्ग राज्यातील अनेक महत्त्वाची तीर्थक्षेत्रे जोडणार आहे. माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबाजोगाई ही तीर्थक्षेत्रे या शक्तीपीठ महामार्गाने जोडली जाणार आहेत.

एवढेच नाही तर १२ ज्योतिर्लिंगांपैकी औंढा नागनाथ व परळी वैजनाथ, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा (लाड), नृसिंहवाडी, औदुंबर ही धार्मिक स्थळेही या महामार्गामुळे एकमेकांना कनेक्ट होणार आहेत. यामुळे राज्यातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. यामुळे भाविकांना राज्यातील सर्वच महत्त्वाच्या तीर्थ क्षेत्रांना सहजतेने जाता येणार आहे.

कोणत्या जिल्ह्यातून जाणार मार्ग?

मिळालेल्या माहितीनुसार, शक्तिपीठ महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून जाणार आहे.

पुढे हा मार्ग गोवा आणि महाराष्ट्राच्या सरहद्दीवर कोकण द्रुतगती महामार्गाला जोडला जाणार आहे. परिणामी राज्यातील या बारा जिल्ह्यांमधील कनेक्टिव्हिटी आधीच्या तुलनेत अधिक सक्षम आणि जलद होईल अशी आशा व्यक्त होत आहे.

Leave a Comment