मुंबईत तयार होणार नवीन रेल्वे मार्ग, ‘ही’ 5 नवीन स्थानके विकसित होणार, प्रवाशांचा प्रवास होणार गतिमान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Railway News : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी आहे. मुंबई शहरात विविध मल्टिनॅशनल कंपन्यांचे हेड ऑफिस आहे. शिवाय अनेक महत्त्वाची शासकीय कार्यालये देखील मुंबईमध्ये आहेत. परिणामी कामासाठी उपनगरातून येणाऱ्या नागरिकांची संख्या खूपच अधिक आहे.

याशिवाय मुंबईत अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था देखील कार्यरत आहेत. यामुळे राजधानीच्या शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील खूपच अधिक आहे. एकंदरीत मुंबई उपनगरातून दैनंदिन कामानिमित्त मुंबईत जाणाऱ्या लोकांची संख्या खूप अधिक आहे.

दरम्यान ही सारे मंडळी लोकलने प्रवास करते. यामुळे लोकलमध्ये कायमच गर्दी पाहायला मिळते. लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन बनली आहे. मात्र यामधील गर्दी हा चिंतेचा विषय आहे. यामुळे ही गर्दी कमी व्हावी यासाठी रेल्वेकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.

लोकलचा प्रवास हा अधिक जलद आणि सुरक्षित व्हावा तसेच प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा लाभ मिळावा यासाठी रेल्वेने अनेक महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये कर्जत ते पनवेल दरम्यानच्या रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पाचा देखील समावेश होतो.

दरम्यान, याच प्रकल्पाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. हा प्रकल्प मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट अर्थातच एमयूटीपी 3 अंतर्गत तयार होत आहे. या अंतर्गत 29.6 किलोमीटर लांबीचा कॉरिडॉर तयार केला जात आहे.

या रेल्वे मार्गात तीन बोगदे विकसित होणार आहेत. दरम्यान, या बोगद्यांच्या कामाबाबत नवीन अपडेट हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बोगद्यांचे ड्रिलिंगचे काम येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहे.

या तीन बोगद्यांची लांबी 3144 मीटर एवढी आहे. यातील 219 मीटर लांबीचा नढाल बोगदा खोदून पूर्ण झाला आहे. वारवली येथील 2625 मीटर लांबीच्या दुसऱ्या बोगद्याचे आणि किरावली येथील तीनशे मीटर लांबीच्या बोगद्याचे काम सध्या सुरू आहे.

या दोन्ही बोगद्यांचे खोदकाम येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहे. ज्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे त्या बोगद्यामध्ये वॉटरप्रूफिंग आणि काँक्रेट लाइनिंगचे काम देखील पूर्ण झाले आहे. सध्या यामध्ये रेल्वे रुळांचे काम केले जात आहे.

एकंदरीत कर्जत-पनवेल रेल्वे कॉरिडॉरचे 50 टक्के एवढे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे उर्वरित काम देखील जलद गतीने सुरू असून डिसेंबर 2025 पर्यंत हा संपूर्ण कॉरिडॉर प्रवाशांसाठी सुरू होण्याची दाट शक्यता आहे. या प्रकल्पाचे काम डिसेंबर 2016 मध्ये सुरू झाले होते.

या प्रकल्पांतर्गत पाच नवीन स्थानके तयार होणार आहेत. पनवेल, चिकले, महापे, चौक आणि कर्जत ही पाच स्थानके या रेल्वे मार्गावर राहणार आहेत. यामुळे या परिसरातील नागरिकांना जलद गतीने लोकलचा प्रवास करता येणार आहे.

Leave a Comment