OYO रूम मध्ये अविवाहित जोडपे राहिल्यास पोलीस कारवाई करणार का ? कायदा काय सांगतो, पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OYO Room : लिविंग रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना तसेच अविवाहित प्रेमी जोडप्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागतो. खरेतर, भारतीय संस्कृतीत लग्नाआधी मुलगा आणि मुलगी एकत्र राहणे चांगले मानले जात नाही.

अलीकडे मात्र भारतीय संस्कृतीत देखील मोठा बदल पाहायला मिळत आहे. अनेकजण आता लग्न होण्याआधीच एकत्र राहू लागले आहेत.

दरम्यान अनेक अविवाहित जोडप्यांच्या माध्यमातून जर ओयो रूम मध्ये अविवाहित जोडपें एकत्र राहिले तर त्यांच्यावर पोलीस कारवाई होणार का ? हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान, आज आपण याच प्रश्नासंदर्भात महत्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

काय सांगतो कायदा

ओयो हॉटेल्स मध्ये अविवाहित जोडपे राहिल्यास पोलीस कारवाई करू शकतात का ? अथवा पोलिसांनी अशी कारवाई केल्यास अविवाहित जोडप्यांना कोणकोणते अधिकार उपलब्ध आहेत किंवा अविवाहित जोडप्यांनी काय केले पाहिजे याबाबत तज्ञ लोकांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

भारतात कुठलीही स्त्री अथवा पुरुष जर 18 वर्षांपेक्षा अधिक वयाचे असतील आणि ते जर एकमेकांच्या सहमतीने एखाद्या हॉटेलमध्ये राहत असतील तर तो गुन्हा मानला जात नाही.

अठरा वर्षांपेक्षा अधिक वयाचे अविवाहित जोडपे एखाद्या हॉटेलमध्ये राहत असेल तर ते कोणत्याही कायद्याअंतर्गत गुन्हा मानले जाणार नाही अथवा असे कृत्य कायद्याचे उल्लंघन करत नाही.

मात्र अविवाहित जोडप्यांनी हॉटेलमध्ये राहताना नेहमी त्यांच्या वयाचा पुरावा सोबत बाळगला पाहिजे. आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी यांसारखे कागदपत्र सोबत बाळगले पाहिजे.

म्हणजेच अविवाहित जोडप्यांनी हॉटेलमध्ये राहताना वयाचा पुरावा सोबत बाळगला पाहिजे जेणेकरून जर त्यांना पोलिसांनी किंवा इतर व्यक्तींनी अडवले किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर ते वयाचा पुरावा त्यांना दाखवू शकतात.

अर्थातच अविवाहित जोडप्यांना भारतातील कोणत्याही हॉटेलमध्ये राहण्याचा संपूर्ण अधिकार आहे. हा व्यक्तीचा राईट टू प्रायव्हसी आणि राईट टू मोमेंटचा अधिकार आहे.

यामुळे अविवाहित जोडपे भारतात कोणत्याही हॉटेलमध्ये राहू शकतात. कायद्याने अशा कृत्याला गुन्हा म्हणून संबोधलेले नाहीये.

Leave a Comment