Indian Driving License : जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच उपयुक्त राहणार आहे. खरंतर, कोणत्याही देशात वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता असते. आपल्या देशातही वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे.
आपल्या देशात आरटीओच्या माध्यमातून ड्रायव्हिंग लायसन्स वाहन चालकाला दिले जाते. दरम्यान आज आपण भारतातील ड्रायव्हिंग लायसन्स इतर देशात वापरले जाऊ शकते का? आणि हो तर कोणकोणत्या देशात वापरले जाऊ शकते ? याविषयी जाणून घेणार आहोत.
भारतातील ड्रायव्हिंग लायसन्स इतर देशांमध्ये मान्य आहे का ?
मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील ड्रायव्हिंग लायसन्स अर्थातच वाहन परवाना हा जगातील इतरही देशात मान्य आहे. जगातील तब्बल 15 देशांमध्ये Indian Driving License मान्य आहे. म्हणजेच जर तुमच्याकडे इंडियन ड्रायव्हिंग लायसन्स भारतातील वाहन परवाना असेल तर तुम्ही जगातील पंधरा देशांमध्ये वाहन चालवण्यास पात्र राहणार आहात.
कोणकोणत्या देशात चालते भारतातील डीएल
अमेरिकेत तुम्ही भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स असल्यास गाडी चालवू शकता. अमेरिकेत भारतीय डीएल मान्य आहे.
कॅनडामध्ये देखील भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स मान्य आहे. परंतु कॅनडामध्ये तुम्ही फक्त 60 दिवसांसाठी भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सने गाडी चालवू शकता यानंतर तुम्हाला कॅनडामधील ड्रायव्हिंग लायसन्स काढावे लागेल.
जर्मनीमध्ये सुद्धा भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स मान्य आहे. मात्र इथेही 60 दिवसांसाठीच भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स चालेल. यानंतर तेथील ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला काढावे लागेल.
स्पेन या देशातही भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स मान्य आहे. इथे तब्बल सहा महिन्यांसाठी भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स मान्य असते. यानंतर तुम्हाला स्पेन देशातील डीएल लागेल.
ऑस्ट्रेलियामध्ये तीन महिन्यांसाठी भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स मान्य आहे. तीन महिन्यानंतर तुम्हाला ऑस्ट्रेलियामधील DL काढावे लागेल.
फिनलँडड, स्वीटजरलँड, युके, हांगकांग, स्विडन आणि न्यूझीलंड या देशातभारतीय ड्रायव्हिंग लायसन्स 1 वर्षासाठी मान्य आहे.
साऊथ आफ्रिका, मलेशिया आणि भूतान या देशातही भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स मान्य आहे.