ब्रेकिंग ! हवामानात मोठा बदल, ‘या’ भागात परतीचा पाऊस जोरदार बरसणार; हवामान विभागाचा नवीन अंदाज काय?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Update : भारतीय हवामान खात्याने जाहीर केल्याप्रमाणे मान्सूनचा परतीचा प्रवास गेल्या महिन्यातील 25 तारखेपासून सुरू झाला आहे. 25 सप्टेंबर पासून मान्सूनने पश्चिम राजस्थान मधून परतीचा प्रवास सुरू केला होता. आता देशातील विविध राज्यांमधून मान्सूनने काढता पाय घेतला आहे.

आपल्या महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यातूनही विविध भागामधून मान्सून माघारी फिरला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणेसह मराठवाडा आणि विदर्भ विभागातून मान्सून माघारी फिरला आहे. यामुळे महाराष्ट्र सह देशातील काही भागांमध्ये ऑक्टोबर हिटचा अनुभव नागरिकांना अनुभवायला मिळत आहे.

ऑक्टोबर हिटमुळे नागरिक घामाघुम होत आहेत. आपल्या राज्यातही अनेक ठिकाणी तापमानात मोठी वाढ झाली आहे आणि ऑक्टोबर हिटमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. तर काही भागात थंडीची चाहूल लागली आहे.

दरम्यान भारतीय हवामान विभागाने एक अतिशय महत्त्वाचा हवामान अंदाज जारी केला आहे. भारतीय हवामान विभाग अर्थातच आयएमडीने येत्या 24 तासात देशातील काही राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार केरळमध्ये 13 ऑक्टोबर पर्यंत पावसाची शक्यता कायम राहणार आहे. याशिवाय कर्नाटक, तेलंगाना आणि महाराष्ट्रातही येत्या 24 तासात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे.

याशिवाय दक्षिण भारतातही काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागासोबतच स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने देखील देशात आगामी काही तासात पाऊस पडू शकतो अशी शक्यता वर्तवली आहे.

स्कायमेट ने दिलेल्या माहितीनुसार, तमिळनाडू, उत्तर केरळ, दक्षिणी कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमध्ये एक किंवा दोन ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तर रायलसीमा, मणिपूर आणि मिझोरममध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

महाराष्ट्रात पुढील 9 दिवस उकाडा जाणवणार

दरम्यान काल भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी राज्यात आगामी 9 ते 10 दिवस तापमानात वाढ कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. पुढील नऊ ते दहा दिवस राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. मात्र दहा दिवसानंतर राज्यातील तापमानात हळूहळू कपात होईल आणि थंडीची चाहूल लागेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment