हवामान अंदाज : पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये परतीचा पाऊस बरसणार, हवामान खात्याचा नवीन अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Havaman Andaj 2023 : महाराष्ट्रातील जवळपास निम्म्याहून अधिक भागातून मान्सून माघारी परतला आहे. गेल्या महिन्यात, 25 सप्टेंबर पासून देशातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला. यानंतर टप्प्याटप्प्याने मानसून ने देशातील विविध भागांमधून माघार घेतली आहे.

आपल्या राज्यातूनही जवळपास मान्सून माघारी परतला आहे. तर काही भागातुन मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू आहे. याचा परिणाम म्हणून राज्यातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. तापमान वाढीमुळे नागरिक अक्षरशः घामाघुम होत आहेत. नागरिकांना ऑक्टोबर हिटचा चांगलाच फटका बसत आहे.

विशेष बाब अशी की आगामी आठ ते नऊ दिवस असेच हवामान पाहायला मिळणार आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना सतर्क राहण्याच आवाहन केले जात आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील काही भागांमध्ये परतीचा पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.

यामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना थोडासा दिलासा मिळू शकतो आणि तापमानात घट होऊ शकते असा आशावाद व्यक्त होत आहे. एकंदरीत परतीच्या वाटेवर असलेला मान्सून जाता-जाता पुन्हा एकदा महाराष्ट्रात मनसोक्त बरसण्याची तयारी करत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोबर हिटमुळे त्रस्त जनतेला थोडासा दिलासा मिळू शकतो असे सांगितले जात आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मराठवाडा, विदर्भासह इतर भागांतून पाऊस माघारी फिरला आहे. या संबंधित भागांमध्ये आता पावसाची विश्रांती पाहायला मिळत आहे. पण राज्यातील काही भागात पुन्हा एकदा परतीच्या पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे.

कोकण आणि गोव्यालगत असणाऱ्या काही भागांमध्ये आता पुन्हा एकदा पाऊस बरसणार असा अंदाज भारतीय हवामान विभाग अर्थातच आयएमडीने वर्तवला आहे. तसेच कोकणातील किनारपट्टीनजीकच्या काही भागांमध्ये सुद्धा पावसाच्या तुरळक सरी बरसतील असा अंदाज आहे. याशिवाय, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतही काही तासांसाठी पाऊस हजेरी लावणार अस IMD ने सांगितलं आहे.

Leave a Comment