ब्रेकिंग ! 100 रुपयाच्या आनंदाच्या शिधाबाबत शिंदे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, सर्वसामान्य नागरिकांना मिळणार मोठा दिलासा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Anandacha Shidha 2023 : महाराष्ट्र राज्य शासन राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना चालवते. राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब जनतेसाठी वेगवेगळे निर्णय घेतले जातात. गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात शिंदे सरकारने सर्वसामान्य गरीब जनतेचा सण गोड व्हावा म्हणून शंभर रुपयात त्यांना आनंदाचा शिधा देण्याची योजना सुरू केली होती.

दिवाळीच्या सणाला गोरगरीब जनतेला 100 रुपयात साखर, चणाडाळ, रवा व पामतेल या चार वस्तू देण्यात आल्यात. यामुळे गोरगरीब जनतेला गेल्या दिवाळीत मोठा दिलासा मिळाला होता. विशेष बाब अशी की राज्य शासनाने गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला देखील आनंदाचा शिधा वितरित केला होता.

यामुळे सर्व सामान्यांना त्यावेळी देखील मोठा दिलासा मिळाला आणि शासनाचे सर्वसामान्यांनी तोंड भरून कौतुक केले. दरम्यान, यावर्षीच्या गणेशोत्सवाच्या आणि दिवाळीच्या सणाला देखील आनंदाचा शिधा वितरित करण्याचा महत्त्वाचा निर्णय वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकारने घेतला आहे.

यानुसार गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर शंभर रुपयात साखर, चणाडाळ, रवा व पामतेल या चार वस्तू पात्र रेशन कार्ड धारकांना मिळाल्या आहेत. तसेच आता पुढल्या महिन्यात साजरा होणाऱ्या दिवाळीच्या सणाला देखील आनंदाचा शिधा वितरित केला जाणार आहे.

अशातच मात्र आनंदाच्या शिधा बाबत एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर, गणेशोत्सवाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर 10 ऑक्टोबर पर्यंत आनंदाचा शिधा वितरित करण्याची मुदत होती. मात्र आत्तापर्यंत फक्त 95 टक्के आनंदाचा शिधा वितरित झाला आहे. त्यामुळे शिल्लक आनंदाचा शिधा जो घेईल त्याला द्यावा असे आदेश राज्य शासनाने काढले आहेत.

यामुळे राज्य शासनाचा हा निर्णय गोरगरिबांसाठी फायद्याचा ठरणार आहे. ज्या व्यक्तीला याची  आवश्यकता असेल तो व्यक्ती शिल्लक शिधा रेशन दुकानातुन मिळवू शकतो. यामुळे सणासुदीच्या काळात गोरगरीब जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे यात शँकाच नाही.

Leave a Comment