Indian Railway Rule : भारतातून एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवासासाठी प्रामुख्याने बस आणि रेल्वेचा वापर केला जातो. बसच्या प्रवासापेक्षा मात्र रेल्वेचा प्रवास अधिक गतिमान आणि खिशाला परवडणारा आहे. हेच कारण आहे की रेल्वेने प्रवास करणे अनेकांना आवडते. मध्यमवर्गीय रेल्वेने प्रवास करण्यास सर्वाधिक पसंती दाखवतात.
मात्र रेल्वेचा प्रवास जेवढा कीफायदेशीर आहे तेवढाच त्रासदायक देखील. रेल्वेच्या लांबच्या प्रवासादरम्यान अनेकदा प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. प्रवाशांना अनेकदा मनपसंत सीट मिळत नाही यामुळे रेल्वेचा प्रवास अनेकांना डोईजड होतो. अनेकांना रेल्वेचा प्रवास करताना लोअर बर्थ सीट हवी असते मात्र त्यांना ही सीट मिळत नाही.
अशा परिस्थितीत आज आपण लोअर बर्थ सीट मिळवण्यासाठी प्रवाशांनी काय केले पाहिजे, ही सीट कोणाला मिळू शकते, याबाबत रेल्वेने काय नियम तयार केले आहेत? याविषयी थोडक्यात पण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी.
कोणाला मिळते लोअर बर्थ सीट
सीट बुकिंग संदर्भात भारतीय रेल्वेने काही नियम तयार केले आहेत. यामध्ये लोअर बर्थ सीट बुकिंग बाबत देखील काही महत्त्वाचे नियम तयार करण्यात आले आहेत. भारतीय रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ही सीट काही लोकांसाठी आरक्षित असते.
ही सीट काही लोकांसाठी आरक्षित असल्याने सर्वप्रथम आरक्षित लोकांना ही सीट मिळते आणि त्यानंतर मग इतर लोकांसाठी या सीटची बुकिंग सुरू केली जाते. ही सीट राखीव लोकांना आधी मिळते, यानंतर मग दुसरा बर्थ दिला जातो.
असे सांगितले जाते की लोअर बर्थ ही सर्वप्रथम विकलांग लोकांना दिले जाते, यानंतर मग ज्येष्ठ नागरिकांना हा लोअर बर्थ मिळतो तसेच यानंतर मग हा लोअर बर्थ महिलांना दिला जातो. मिळालेल्या माहितीनुसार, अपंग व्यक्तींना स्लीपर क्लास मध्ये चार आणि एसी मध्ये दोन जागा राखीव असतात.
इकॉनोमिक क्लास मध्ये देखील अपंगांना दोन जागा राखीव असतात. या ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिकांना न विचारता देखील संबंधितांना लोअर बर्थ मिळतो. गर्भवती महिलांना देखील लोअर बर्थ दिला जात असतो.