Kanda Market Maharashtra : महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनासाठी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. परंतु नासिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद केले आहेत.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर या उपबाजारात कांद्याचे लिलाव सुरू झाले आहेत मात्र इतर बाजार समितीमध्ये अजूनही कांद्याचे लिलाव सुरू झालेले नाहीत. येत्या काही दिवसात जिल्ह्यातील या बाजार समितीमध्ये देखील लिलाव सुरू होतील असा आशावाद व्यक्त होत आहे. दरम्यान आज आपण राज्यातील पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यात कांद्याला काय भाव मिळतोय याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरंतर केंद्र शासनाने कांदा निर्यातीसाठी 40% शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही काळ कांद्याचे बाजार मंदीत होते. मात्र आता पुन्हा एकदा कांदा बाजारात तेजी येऊ लागली आहे. अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील बहुतांशी बाजारात कांद्याला चांगला भाव मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठे समाधान पाहायला मिळत आहे.
पुणे आणि अहमदनगर मध्ये कांद्याला काय भाव मिळतोय
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात काल म्हणजे 30 सप्टेंबर रोजी 57 हजार 963 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. या मार्केटमध्ये काल कांद्याला किमान 250 कमाल, 2,600 आणि सरासरी 1850 एवढा भाव मिळाला.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये काल 7364 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झांली. तसेच काल इथे कांद्याला किमान 200, कमाल 2500 आणि सरासरी 1600 रुपये भाव मिळाला.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये काल पाच हजार दहा क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. कालच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 800, कमाल 2300 आणि सरासरी 2050 एवढा भाव मिळाला.
नेवासा घोडेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये काल 33 हजार 29 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. काल या मार्केटमध्ये कांद्याला किमान 300, कमाल 3425 आणि सरासरी 2400 रुपये एवढा भाव मिळाला.
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज अर्थातच 1 सप्टेंबर 2023 रोजी 6550 क्विंटल कांद्याची आवक झाली. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 700, कमाल 2800 आणि सरासरी 1800 रुपये एवढा भाव मिळाला.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज अर्थातच 1 सप्टेंबर 2023 रोजी 17881 क्विंटल लोकल कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 800, कमाल 2400 आणि सरासरी 1600 रुपये भाव मिळाला.
पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याचे बाजार भाव थोडेसे दबावत होते. आज इथे कांद्याला किमान 700, कमाल 1800 आणि सरासरी 1250 रुपये एवढा भाव मिळाला.