Kharif Season Fertilizer Rate : मान्सून 2024 ला आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. येत्या काही दिवसांनी मोसमी पावसाला सुरुवात होईल आणि खरीप हंगामाच्या पीक पेरणीला देखील सुरुवात होणार आहे. पीक पेरणीपूर्वी तथा पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी खतांचा देखील वापर करावा लागणार आहे.
अशातच मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये आणि प्रसारमाध्यमांमध्ये रासायनिक खतांच्या किमती ऐन खरीप हंगामापूर्वीच वाढल्या असल्याच्या बातम्या वेगाने व्हायरल होत होत्या. यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील मोठी नाराजी पाहायला मिळाली होती.
खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात खतांची गरज भासत असते आणि ऐन खरीप हंगामा पूर्वीच खतांच्या किमती वाढवल्या गेल्या असल्याने उत्पादन खर्चात वाढ होणार असे मत शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त केले जात होते. यामुळे शेतकरी नाराज झाले होते.
परंतु प्रत्यक्षात रासायनिक खतांच्या किमती वाढल्या नसल्याचे कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खतांच्या किमती वाढवल्या गेल्या असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतेच तथ्य नाहीये.
खरे तर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोशल मीडियामध्ये सरकारने मिश्र खतांच्या किमती वाढवल्या असल्याच्या बातम्या जलद गतीने वायरल होत होत्या. मिश्र खतांची पीक उत्पादनात महत्त्वाची भूमिका असते. अशा परिस्थितीत मिश्र खतांच्या किमती वाढल्या असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून जोरदार नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
पण, मिश्र खतांच्या किमती वाढवल्या गेलेल्या नाहीत. सध्या खात्यांच्या ज्या किमती आहेत त्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोणतीच वाढ करण्यात आलेली नाहीये. दरम्यान, कृषी विभागाने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये मोठे उत्साहाचे आणि प्रसन्न वातावरण पाहायला मिळत आहे. आता आपण रासायनिक खतांच्या प्रत्यक्षात किमती किती आहेत याची माहिती पाहणार आहोत.
रासायनिक खतांच्या किमती (प्रति बॅग)
युरिया – २६६.५०
डीएपी – १३५०
एमओपी – १६५५ ते १७००
एनपीके (१९ः१९ः१९) – १६५०
एनपीके (१०ः२६ः२६) – १४७०
एनपीके (१४ः३५ः१४) – १७००
एनपीएस (२०ः२०ः०ः१३) – १२००-१४००
एसएसपी (जी) – ५३०.५९
एसएसपी (पी) – ४९०.५५