कोब्रा की किंग कोब्रा कोणता साप आहे सर्वात जास्त खतरनाक ? दोघांमधला फरक तुम्हाला माहितीये का ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kobra Vs King Kobra : साप हा असा सरपटणारा प्राणी आहे ज्याला पाहून साऱ्यांना भीती वाटते. साप दिसला तरी पायाखालची वाळू सरकते. सापाला पाहूनच अनेकांना घाम फुटतो. खरे तर दरवर्षी सर्पदंशामुळे भारतात हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. यामुळे साप दिसला की त्यापासून चार हात लांब राहिलेलेचं बरे. तसेच जर आपल्या घरात किंवा आजूबाजूच्या परिसरात साप आढळला तर सर्पमित्राला पाचारण करून तो साप दूर जंगलात सोडून देणे आवश्यक आहे.

कारण की सापाची पर्यावरणाला फार आवश्यकता आहे. मानवाप्रमाणेच साप देखील पृथ्वीवरील एक अविभाज्य घटक असून त्याचे संवर्धन होणे आवश्यक आहे. खरे तर सापाच्या हजारो प्रजाती आहेत. आपल्या भारतात देखील शेकडो प्रजाती आपल्याला पाहायला मिळतील.

मात्र यातील काही बोटावर मोजण्या इतक्याचं जाती विषारी आहेत. भारतात आढळणाऱ्या बहुतांशी सापाच्या जाती या बिनविषारी आहेत. पण, भारतात आढळणाऱ्या कोब्रा आणि किंग कोब्रा या दोन्ही जाती विषारी आहेत. सापाच्या विविध प्रजातींपैकी या दोन प्रजाती सर्वाधिक विषारी सापांच्या प्रजातींमध्ये समाविष्ट होतात.

हे साप आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात आढळतात. पण तुम्हाला या दोन सापांमधील फरक माहिती आहे का? यापैकी कोणता साप सर्वात जास्त खतरनाक आहे, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नाही मग आज आपण कोब्रा आणि किंग कोब्रा यामधील फरक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

काय आहे फरक?

तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, कोब्रा या सापाची लांबी चार ते सात फूट आणि किंग कोब्राची लांबी 13 फुटापर्यंत असते. विशेष म्हणजे किंग कोब्राची लांबी 13 फुटांपेक्षाही अधिक असू शकते. हे साप 13 ते 23 फूट लांबीचे असू शकतात.

कोब्रा आणि किंग कोब्रा दोन्हींच्या विषामुळे अवघ्या पंधरा मिनिटात माणसाचा मृत्यू होऊ शकतो. असे म्हणतात की किंग कोब्राच्या विषाने एकाच वेळी 11 व्यक्तींचा मृत्यू होऊ शकतो. कोब्राच्या दातापेक्षा किंग कोब्राचे दात हे मोठे असतात.

किंग कोब्राच्या फनावर पट्टे असतात. कोब्राच्या फनाचा आकार हा काहीसा वेगळा असतो. किंग कोब्रा हा त्याच्या लांबीच्या एक तृतीयांश पर्यंत उंच होऊ शकतो. किंग कोब्रा हा साप तब्बल वीस वर्षापर्यंत जगतो.

एकंदरीत कोब्रा आणि किंग कोब्रा हे दोन्ही साप विषारी आणि खूपच खतरनाक आहेत. यामुळे नेहमीच कोब्रा असो किंवा किंग कोब्रा असो या सापांपासून दूर राहिले पाहिजे. आपण जर सापांना त्रास दिला नाही तर ते आपल्यावर हल्ला चढवत नाही.

यामुळे साप दिसला की सर्वप्रथम जवळील सर्पमित्राला फोन लावा आणि तो साप पकडून दूर जंगलात सोडून द्या. विनाकारण साप पकडण्याचा प्रयत्न करू नका. किंवा त्याला घाबरवण्याचा आणि मारण्याचा प्रयत्न करू नका. अशा प्रयत्नांमध्ये तुमचा मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे सापापासून नेहमीच एक सुरक्षित अंतर ठेवले पाहिजे.

Leave a Comment