Konkan Railway News : राजधानी मुंबईमध्ये कामानिमित्त कोकणातील हजारो लोक स्थायिक झाले आहेत. या कोकणातील चाकरमान्यांसाठी आता मध्य रेल्वेने आणि कोकण रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. खरंतर मुंबईमधील चाकरमाने गणेशोत्सवासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने कोकणात जातात. कोकणात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो.
गणेशोत्सवासाठी मुंबईसह राज्याच्या वेगवेगळ्या भागात स्थायिक झालेले कोकणवासी गावाकडे परततात. यंदाही हजारो नागरिक गणेशोत्सवाला गावी, कोकणात जाणार आहेत. अशा परिस्थितीत मुंबईमध्ये स्थायिक झालेल्या कोकणातील नागरिकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेने 24 डब्ब्याच्या 18 विनारक्षित रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
खरंतर या आधी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेने 208 आणि पश्चिम रेल्वे तसेच कोकण रेल्वेने 40 रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांची घोषणा केली आहे. आता यामध्ये आणखी 18 फेऱ्यांची भर पडली आहे. म्हणजेच आता एकूण 266 फेऱ्या पश्चिम, मध्य आणि कोकण रेल्वे कडून चालवल्या जाणार आहेत.
यामुळे गणेश उत्सव साजरा करण्यासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आज आपण मध्य आणि कोकण रेल्वेने नव्याने घोषित केलेल्या 18 फेऱ्यांच्या वेळापत्रकाबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते कुडाळ दरम्यान गणपती विशेष गाडी सुरू करण्यात येणार आहे. ही गाडी 13 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान चालवली जाणार आहे. ही गाडी या कालावधीत सोमवारी, बुधवारी आणि शनिवारी चालवली जाणार असून या गाडीच्या एकूण नऊ फेऱ्या होणार आहेत.
ही गाडी एलटीटी म्हणजे मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वेस्थानकावरून रात्री पाऊण वाजता रवाना होणार आणि सकाळी साडेअकरा वाजता कुडाळ येथील रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. तसेच कुडाळ ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान 13 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान गणपती विशेष गाडी चालवली जाणार आहे.
या गाडीच्या या कालावधीमध्ये एकूण नऊ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. ही गाडी या कालावधीत मंगळवार, गुरुवार आणि रविवारी धावणार आहे. ही गाडी कुडाळ येथील रेल्वे स्थानकावरून आठवड्यातून हे तीन दिवस दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी रवाना होणार आणि एलटीटी म्हणजेच लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे मध्यरात्री बारा वाजून 35 मिनिटांनी पोहोचणार आहे.