गणपती बाप्पा नवसाला पावला ! गणपती उत्सवाला कोकणात वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करता येणार, वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Konkan Railway News : देशात सध्या वंदे भारत एक्सप्रेसच्या विशेष चर्चा पाहायला मिळत आहेत. विशेषतः आपल्या महाराष्ट्रात वंदे भारत एक्सप्रेसविषयी मोठी क्रेज पाहायला मिळत आहे. या ट्रेनला रेल्वे प्रवाशांनी मोठी पसंती दाखवली आहे. अल्पावधीतच ही गाडी प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली आहे. हेच कारण आहे की, भारतीय रेल्वेच्या माध्यमातून ही गाडी देशभरातील सर्व महत्त्वाच्या मार्गावर सुरू करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. याच प्रयत्नाचा भाग म्हणून आतापर्यंत देशातील 18 महत्त्वाच्या मार्गावर ही हाय स्पीड ट्रेन सुरू करण्यात आली आहे.

विशेष बाब म्हणजे येत्या काही दिवसात आणखी पाच वंदे भारत एक्सप्रेस केंद्र शासनाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीची तयारी देखील पूर्ण झाली आहे. या पाच वंदे भारत एक्सप्रेस एकाच दिवशी सुरू केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या पाच वंदे भारत एक्सप्रेस मध्ये मुंबई ते गोवा अर्थातच मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवा येथील मडगाव रेल्वे स्थानकादरम्यान सुरू होणाऱ्यां वंदे भारत ट्रेनचा देखील समावेश आहे.

वास्तविक कोकण रेल्वे मार्गावर धावणारी ही पहिली वंदे भारत गाडी राहणार आहे. ही गाडी तीन जून 2023 रोजी सुरू करणे प्रस्तावित होते. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या माध्यमातून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली होती. मात्र दोन जून 2023 रोजी रात्री ओडिशा येथे भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली.

यामुळे तीन जून 2023 रोजी आयोजित केलेला मुंबई गोवा वंदे भारत ट्रेनच्या लोकार्पणाचा सोहळा रद्द करण्यात आला. यानंतर पाच जून 2023 पासून उद्घाटन न करता ही ट्रेन थेट रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल असा दावा केला जात होता. मात्र तसे काही झाले नाही. त्यामुळे आता ही गाडी केव्हा सुरू होणार असा प्रश्न प्रवाशांच्या माध्यमातून वारंवार उपस्थित केला जात होता.

तर अनेकांना ही गाडी रद्द झाली असे वाटत होते. मात्र तसे काही झाले नाही ही गाडी आता 27 जून 2023 रोजी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. 27 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भोपाळ येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एकूण पाच वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या जाणार आहेत. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार, मडगाव (गोवा) – मुंबई, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर, भोपाळ-जबलपूर आणि बेंगळुरु-हुबळी-धारवाड या पाच मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस या दिवशी सुरू होणार आहेत.

एकंदरीत, गेल्या अनेक दिवसांपासून कोकणवासीयांच्या माध्यमातून ज्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेसची आतुरतेने वाट पाहिली जात होती ती एक्सप्रेस आता 27 जून पासून कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. यामुळे मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विशेषता कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वास्तविक, गणपती उत्सवासाठी मुंबईत काम करणारे चाकरमाने मोठ्या प्रमाणात कोकणात जात असतात. गावी म्हणजे कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या खूप अधिक आहे. अशा परिस्थितीत कोकण रेल्वे मार्गावर सुरू होणाऱ्यां या वंदे भारत एक्सप्रेसचा चाकरमान्यांसाठी विशेष फायदा होणार आहे. ही मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेन आठवड्यातून 6 दिवस धावणार आहे. ही गाडी शुक्रवारी धावणार नाही.

ही ट्रेन सकाळी 5.25 वाजता मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गोव्याच्या दिशेने रवाना होणार आहे. आणि दुपारी ही गाडी 1.15 वाजता गोव्यात पोहोचणार आहे. ही ट्रेन गोव्यामधून दुपारी 2.35 वाजता सुटेल आणि रात्री 10.25 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी पोहोचणार आहे. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

Leave a Comment