Maharashtra 11th Admission Process : आज 27 मे 2024 ला महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. आज दुपारी एक वाजता राज्य बोर्डाच्या माध्यमातून इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून दहावीचा निकाल अखेर कधी लागणार हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात होता.
21 मेला बारावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आणि तेव्हापासून तर दहावीच्या निकालाबाबत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि पालकांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती. आता मात्र दहावीच्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची ही आतुरता संपणार आहे, आज दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.
दरम्यान, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी आली आहे. खरतर निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आता पुढील वर्गात प्रवेश देणार आहे. फर्स्ट इयर इन ज्युनिअर कॉलेज म्हणजेच एफवायजेसीला सर्वाधिक विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत.
काही विद्यार्थी डिप्लोमा कोर्सेस करतील तर काही विद्यार्थी एफवायजेसी अर्थातच अकरावीला प्रवेश घेणार आहेत. दरम्यान अकरावीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक कामाची अपडेट समोर आली आहे. अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आले आहे.
उद्यापासून म्हणजेच दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 15 जुलैपासून अकरावीच्या विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग सुरू होणार आहेत. अशा परिस्थितीत आपण अकरावीच्या ऍडमिशनचे वेळापत्रक नेमके कसे आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
अकरावीच्या ऍडमिशनचे वेळापत्रक खालील प्रमाणे
प्रवेश अर्ज विक्री व अर्ज स्वीकृती : २८ मे ते ८ जून
प्रवेश अर्जांची छाननी : १० ते १५ जूनपर्यंत
पहिली गुणवत्ता यादी : १८ जून
प्रथम गुणवत्ता यादीनुसार प्रवेश : १८ ते २५ जूनपर्यंत
दुसरी गुणवत्ता यादी : २७ जून
दुसरी गुणवत्ता यादीनुसार प्रवेश : २७ जून ते ४ जुलैपर्यंत प्रवेश
तिसरी गुणवत्ता यादी : ५ जुलै
तिसरी गुणवत्ता यादीनुसार प्रवेश : ५ ते ८ जुलैपर्यंत प्रवेश
विशेष फेरी (एटीकेटीसह) : ९ ते १२ जुलैपर्यंत