महाराष्ट्रातील भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय ! ‘या’ शेतकऱ्यांचा सातबारा उतारा होणार बंद, तुमचाही 7/12 बंद होणार का ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी, जमीनधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे राज्यातील भूमी अभिलेख विभागाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून या निर्णयाअंतर्गत राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचा सातबारा बंद होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील जवळपास साडेसात लाख सातबारे बंद होणार आहेत. एका शासकीय आकडेवारीनुसार, आपल्या राज्यात जवळपास 2 कोटी सातबारा ऊतारे आहेत. यापैकी आता साडेसात लाख सातबारा बंद होणार आहेत.

राज्यातील जवळपास 45 हजार गावांपैकी साडेचार हजार गावांतील हे साडे सात लाख सातबारे उतारे बंद केले जाणार आहेत. ज्या गावात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे त्या गावातील सातबारा उतारे बंद होऊन तेथील जमीन धारकांना आता मिळकत प्रमाणपत्र म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड बहाल केले जाणार आहे.

खरंतर गेल्या काही दशकांमध्ये आपल्या महाराष्ट्रातील विविध शहरांचा झपाट्याने विस्तार झाला आहे. पुण्याला लागुन असलेल्या भागाचाही मोठा झपाट्याने विस्तार झाला आहे. यामुळे या साडेसात लाख उताऱ्यांमध्ये पुणे विभागातील सर्वाधिक उतारे आहेत.

एकट्या पुणे विभागाचा विचार केला तर पुणे विभागात पावणे दोन लाख सातबारे उतारे बंद करून त्याऐवजी मिळकत प्रमाणपत्र संबंधितांना बहाल केले जाणार आहे. याबाबतची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून सुरू देखील करण्यात आली आहे.

दरम्यान ही सर्व प्रक्रिया ऑफलाईन राहणार असल्याने यासाठी थोडा वेळ लागू शकतो आणि नवीन वर्षात संबंधितांना मिळकत प्रमाणपत्रिका मिळू शकते असा दावा केला जात आहे. राज्यातील पुणे, अहमदनगर, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, ठाणे छत्रपती संभाजी नगर यांसारख्या अनेक मोठ्या शहरांना लागून असलेल्या ग्रामीण भागाचे झपाट्याने शहरीकरण झाले आहे.

शहरालगत वसलेल्या या भागात मोठ्या प्रमाणात शहरीकरण आणि नागरीकरण होऊ लागले आहे. यामुळे या भागात महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम १२२ नुसार जारी झालेल्या अधिसूचनेप्रमाणे ठराविक सर्व्हे क्रमांक निश्चित केला जाणे अपेक्षित आहे.

यानुसार आता राज्यातील या संबंधित भागातील जमीनधारकांचे सातबारा बंद केले जाणार आहेत. तसेच त्यांना आता प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे. याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागाकडून केली जात आहे.

ही प्रक्रिया ऑफलाइन असून, सुमारे सात लाख ३८ हजार सातबारे बंद होणार अशी माहिती भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून समोर आली आहे. भूमी अभिलेख विभागाच्या माहिती तंत्रज्ञान कक्षाच्या संचालिका सरिता नरके यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

नरके यांनी लोकमत या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, सध्या पावणे सात लाख सातबारा उतारे बंद झाले असून, उर्वरित सुमारे 63 हजार उतारे बंद करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

लवकरच सर्व 7/12 उतारे बंद केले जातील आणि त्यानंतर संबंधितांना प्रॉपर्टी कार्ड दिले जातील. तसेच त्यांनी ‘महाभूमी’ पोर्टलवर सातबारा आणि मिळकत पत्रिका असे दोन्ही अभिलेख असणारी सुविधा उपलब्ध असल्याचे देखील सांगितले आहे.

Leave a Comment