अधिक उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या ‘या’ सर्वोत्कृष्ट जातीची पेरणी यंदा शेतकऱ्यांसाठी ठरणार लाखमोलाची ! वाचा सविस्तर 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Farming : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. यंदाच्या रब्बी हंगामात गहू आणि हरभरा पेरणी मोठ्या प्रमाणात होणार आहे. खरंतर गहू हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य कॅश क्रॉप आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गव्हाची लागवड केली जाते. यावर्षी कमी पावसामुळे गहू लागवडी खालील क्षेत्र थोडे फार कमी होईल असा अंदाज आहे.

पण ज्या भागात समाधानकारक पाऊस झाला आहे तिथे गव्हाची लागवड वाढेल असा अंदाज आहे. दरम्यान गव्हाच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी गव्हाच्या सुधारित वाणाची पेरणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यावर्षी कमी पावसामुळे शेतकरी बांधवांनी कमी पाण्यात तयार होणाऱ्या गव्हाच्या वाणाची पेरणी केली पाहिजे.

तसेच ज्या शेतकऱ्यांकडे चांगले पाणी असेल त्यांनी गव्हाच्या उच्च उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या वाणाची पेरणी केली पाहिजे असे जाणकारांनी सांगितले आहे. आज आपण गव्हाच्या उच्च उत्पादन देणाऱ्या काही प्रमुख जाती जाणून घेणार आहे. विशेष म्हणजे आज आपण ज्या वाणाविषयी जाणून घेणार आहोत त्या सर्व जाती राज्यातील हवामानासाठी अनुकूल राहणार आहेत.

गव्हाच्या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती

श्रीराम सुपर 111 : महाराष्ट्रातील हवामानासाठी ही जात अनुकूल आहे. राज्यातील विविध भागातील शेतकरी बांधव अलीकडे या वाणाची मोठ्या प्रमाणात पेरणी करू लागले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या जातीची लोकप्रियता वाढली आहे. पीक पेरणीनंतर सरासरी 115 ते 120 दिवसात या जातीचा वाण परिपक्व होतो. तसेच या जातीचे पीक मध्यम उंचीचे असते.

या जातीचे पिक 107cm पर्यंत वाढते. या जातीच्या पिकाला चार ते पाचदा पाणी भरावे लागते. या जातीपासून जवळपास 25 क्विंटल प्रति एकर पर्यंत चे उत्पादन मिळू शकते. उत्पादनासाठी चांगला आहे मात्र या जातीची पेरणी केली तर पिक परिपक्व झाल्यानंतर लवकर हार्वेस्टिंग करणे आवश्यक आहे. पण हार्वेस्टिंगच्या वेळी या जातीच्या गव्हाच्या ओंब्या फुटतात.

श्रीराम सुपर 303 : हा देखील वाण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये अलीकडे लोकप्रिय बनला आहे. या जातीचे पीक देखील शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळवून देत आहे. या जातीपासूनही सरासरी 25 ते 28 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते. चांगले नियोजन केले तर या जातीचे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणाऱ यात शंकाच नाही.

अजित 102 : गव्हाचा हा वाण चपातीसाठी उत्कृष्ट आहे. सोबतच गव्हाचा हा वाण उच्च उत्पादनासाठी ओळखला जातो. या जातीपासून एकरी 28 ते 29 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते असा दावा केला जातो. त्यामुळे जर यंदा तुम्हाला गव्हाची पेरणी करायची असेल तर तुम्ही या वाणाची निवड करू शकता. महाराष्ट्रातील हवामान या जातीला विशेष पूरक आहे.

अंकुर केदार : महाराष्ट्रातील हवामान यादेखील जातीला मानवते. या जातीची राज्यातील विविध भागात पेरणी पाहायला मिळते. या जातीपासून सरासरी 25 ते 26 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. विशेष म्हणजे या जातीचे पीक पेरणीनंतर काढणीसाठी उशीर झाला तरी देखील पिकावर विपरीत परिणाम होत नाही. म्हणजेच काढणीच्या वेळी ओंब्या फुटत नाहीत.

म्हायको मुकुट : म्हायको कंपनीचे मुकुट हे वाण विदर्भात आणि मराठवाड्यात विशेष लोकप्रिय आहे. या वाणाची राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात पेरणी केली जात आहे. येथील शेतकऱ्यांमध्ये हा वाण लोकप्रिय असला तरी देखील संपूर्ण महाराष्ट्रातील हवामान या जातीला मानवते.

लोकवन : जर तुमच्याकडे कमी पाणी असेल तर तुम्ही या वाणाची पेरणी करू शकता. कमी पाण्यात या जातीपासून चांगले उत्पादन मिळते. विशेष म्हणजे पुरणपोळी साठी आणि चपातीसाठी हा वाण खूपच उत्कृष्ट आहे. या वाणाच्या गव्हापासून उत्कृष्ट पुरणपोळ्या येतात. यामुळे या वाणाच्या गव्हाला बाजारात नियमित चांगला दर मिळतो. मात्र या वाणाचे पीक परिपक्व झाल्यानंतर लवकरात लवकर काढणी करणे अपेक्षित आहे.

Leave a Comment