10 वी आणि 12 वी चा निकाल कधी लागणार ? शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Board 10th And 12th Result 2024 : गेल्या अनेक दिवसांपासून दहावी आणि बारावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. सोशल मीडियामध्ये बोर्ड परीक्षेच्या निकालाच्या वेगवेगळ्या तारखा फिरत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठे संभ्रमाचे वातावरण आहे. पालक आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अखेर दहावी आणि बारावीचा निकाल लागणार तरी कधी हाच मोठा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान याच निकाला संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची माहिती समोर आली आहे. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याबाबत एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टला मोठी अपडेट दिली आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की महाराष्ट्र बोर्डाने यंदा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत 12 वी ची बोर्ड परीक्षा घेतली होती. दहावीच्या परीक्षेबाबत बोलायचं झालं तर ही एक्साम 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत संपन्न झाली होती.

या दोन्ही वर्गाच्या परीक्षेला लाखो विद्यार्थी बसले होते. दरम्यान आता या लाखो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकालाची आतुरता आहे. सोशल मीडियामध्ये आधी 10 मे ला बारावीचा निकाल जाहीर केला जाणारा असा दावा केला जात होता.

यानंतर आता 25 मे 2024 ला बारावीचा निकाल जाहीर होऊ शकतो असा दावा होत आहे. मात्र महाराष्ट्र राज्य बोर्डाने अजून निकालाची तारीख डिक्लेअर केलेली नाही. यामुळे सोशल मीडियामध्ये होत असलेला हा दावा निरर्थक आहे.

दहावी आणि बारावीच्या निकाला संदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी असे म्हटले आहे की, राज्य मंडळाकडून दहावी बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षांचे काम जवळपास पूर्ण झाले असून येत्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करण्यात येईल.

मग त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. पुरवणी परीक्षाही वेळेत घेऊन त्यांचे निकालही लवकर जाहीर करण्याचा प्रयत्न आहे. एकंदरीत येत्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर होणार आहे आणि त्यानंतरच्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

मात्र कोणत्या तारखेला निकाल जाहीर होणार याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामुळे निकालाची तारीख जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

तथापि निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. या वेबसाईटवर भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांना निकालाच्या लिंक वर क्लिक करावे लागणार आहे. ही लिंक जेव्हा निकाल लागणार तेव्हा सक्रिय होईल.

लिंक वर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा सीट क्रमांक म्हणजेच आसन क्रमांक आणि त्यांच्या आईचे नाव टाकावे लागणार आहे. आसन क्रमांक आणि आईचे नाव प्रविष्ट केल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला रिझल्ट पाहता येणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना या रिझल्टची प्रिंट आऊट देखील काढता येणार आहे.

Leave a Comment