SBI च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! ‘ही’ स्पेशल एफडी स्कीम देते जोरदार परतावा, प्रत्येक महिन्याला खात्यात पैसे जमा होतात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Special FD Scheme : अलीकडील काही वर्षांमध्ये भारतात एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. इतर बचत योजनांपेक्षा एफडी योजनेत गुंतवणूक करण्याला अधिक प्राधान्य दाखवले जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण, आजही अधिकचा परतावा मिळवण्यापेक्षा सुरक्षित गुंतवणुकीला महत्व दाखवले जात आहे.

सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेची एमडी योजना हा सर्वात उत्तम पर्याय आहे. अशातच, एक मोठी बातमी हाती आली आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडियाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे.

जर तुम्हीही एसबीआयचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे. भारतात एकूण 12 पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँक आहेत. यातील एसबीआय ही देशातील सर्वात मोठी पब्लिक सेक्टर बँक आहे. या बँकेने आपल्या करोडो ग्राहकांना 15 मे ला एक मोठी भेट दिली आहे.

SBI ने 15 मे 2024 रोजी FD वरील व्याज दरात मोठी सुधारणा केली आहे. यामुळे आता एसबीआय बँकेत एफडी करणाऱ्यांना जोरदार परतावा मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सदर सरकारी बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात 0.75 टक्क्यांनी वाढ केली आहे.

ही बँक ग्राहकांना सामान्य FD आणि विशेष FD ऑफर करत आहे. बँकेच्या माध्यमातून स्पेशल एफडी स्कीमवर अधिकचा परतावा दिला जात आहे. दरम्यान आज आपण एसबीआयच्या एका स्पेशल एफडी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.

आज आपण ज्या योजनेची माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये गुंतवणूकदारांना सप्टेंबर 2024 पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. यामुळे जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच फायदेशीर ठरणार आहे.

एसबीआय अमृत कलश एफ डी स्कीम

आज आम्ही तुम्हाला SBI स्पेशल FD स्कीम अमृत कलश बद्दल माहिती देणार आहोत. या योजनेत तुम्ही 21 सप्टेंबर 2024 पर्यंत गुंतवणूक करू शकता. ही एफडी योजना 400 दिवसांची आहे. या योजनेत गुंतवणूक करत असलेल्या सामान्य ग्राहकांना 7.10% एवढे व्याज मिळते.

दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांना याच योजनेत 7.60% म्हणजेच सामान्य ग्राहकांपेक्षा 0.50% अधिकचे व्याज दिले जाते. या योजनेत दोन कोटी रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवली जाऊ शकते. या योजनेतून प्राप्त होणारे व्याज हे मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक आधारावर दिले जाते.

या योजनेतून मिळणारे व्याज हे खात्यात कधी जमा झाले पाहिजे याची निवड गुंतवणूकदारांना स्वतः करता येते. यामुळे गुंतवणूकदारांना आपल्या गरजेनुसार या एफडी योजनेतून मिळणारे व्याज काढता येणार आहे. विशेष म्हणजे जर तुम्ही या एफडी योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर कर्ज देखील काढता येणार आहे.

या योजनेत जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळील एसबीआयच्या शाखेत भेट देऊन या एफडी योजनेत गुंतवणूक करू शकता. किंवा एसबीआय नेट बँकिंग आणि योनो ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन देखील गुंतवणूक करू शकता.

Leave a Comment