मान्सूनची आनंदवार्ता आली…! 28 मे ते 3 जून दरम्यान केरळमध्ये येणार ; महाराष्ट्रात कधी पोहोचणार ? समोर आली नवीन अपडेट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon News : मे महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला आहे. राज्यात गेल्या दहा दिवसांपासून वादळी पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे उकाड्याने हैराण जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

परंतु हा वादळी पाऊस शेतकऱ्यांसाठी मोठा चिंतेचा विषय ठरत आहे. वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान केले आहे. रब्बी पिके, फळ पिके या वादळी पावसामुळे प्रभावित झाली आहेत.

दरम्यान या वादळी पावसाचा आगामी मान्सूनवर काही विपरीत परिणाम होणार का ? असा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जाऊ लागला आहे. अशातच मान्सूनची गोड बातमी समोर आली आहे. हवामान खात्याने मान्सूनचे आगमन कधी होणार या संदर्भात मोठी माहिती दिली आहे.

हवामान खात्याने केरळमध्ये आणि महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन कधी होऊ शकते याबाबत महत्त्वाचे अपडेट दिली आहे. दोन दिवसांपूर्वी अर्थातच बुधवारी हवामान खात्याने मान्सून संदर्भात माहिती देताना असे म्हटले आहे की यंदा मान्सूनचे भारताच्या मुख्य भूमीत अर्थातच केरळात एक दिवस आधीच आगमन होणार आहे.

केरळमध्ये मान्सूनचे 31 मे च्या सुमारास आगमन होण्याची शक्यता आहे. दरवर्षी केरळमध्ये मान्सून एक जूनला दाखल होत असतो. यंदा मात्र एक दिवस आधीच केरळमध्ये मान्सून पोहोचणार आहे.

विशेष बाब अशी की अंदमानात देखील दोन दिवस आधीच मान्सूनचे आगमन होणार आहे. अंदमानला मान्सून 19 मे 2024 ला पोहोचणार आहे. दरवर्षी येथे 21 मेला मान्सूनचे आगमन होत असते.

महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन कधी?

केरळमध्ये मान्सूनचे 31 मेला आगमन होण्याची शक्यता आहे. मात्र यामध्ये तीन ते चार दिवस मागेपुढे होण्याची शक्यता आहे. अर्थातच 28 मे ते 3 जून या कालावधीमध्ये केरळमध्ये मान्सून आगमन होणार असे म्हटले जात आहे.

महाराष्ट्रातील मान्सून आगमना बाबत बोलायचं झालं तर राज्यात नऊ ते 16 जून या दरम्यान मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. दरवर्षी मान्सूनचे सर्वप्रथम तळ कोकणात आगमन होते आणि यानंतर तो पुढे सरकत असतो. दरवर्षी महाराष्ट्राच्या तळकोकणात मान्सूनचे आठ जूनच्या सुमारास आगमन होत असते.

यंदा मात्र 9 ते 16जुन या कालावधीमध्ये मान्सून तळकोकणात दाखल होणार असे चित्र तयार होत आहे. विशेष म्हणजे यंदा मान्सून काळात अर्थातच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस होणार असा अंदाज आहे.

यामुळे राज्यासहित देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची वार्ता आहे.

Leave a Comment