महाराष्ट्र बोर्डाचा 10वी चा निकाल कधी लागणार ? शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी थेट तारीखचं सांगितली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Board 10th Result : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी हाती आली आहे. खरेतर, महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा रिझल्ट जाहीर झाला आहे. राज्य बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत एकूण ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीची एकूण 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

त्यापैकी या परीक्षेत एकूण 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा रिझल्ट बाबत विचारणा केली जात होती.

महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी बारावीचा रिझल्ट मे च्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा रिझल्ट मे च्या चौथ्या आठवड्यात जाहीर होणार असे स्पष्ट केले होते.

यानुसार काल अर्थातच 21 मे 2024 ला इयत्ता बारावी वर्गाचा रिझल्ट डिक्लेअर करण्यात आला आहे. काल दुपारी एक वाजता बारावीचा निकाल लागला असून आता दहावीच्या विद्यार्थ्यांकडून निकालाबाबत विचारपूस सुरू झाली आहे.

विद्यार्थी आणि पालक 10वी बोर्डाची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांनी दहावी बोर्ड रिझल्ट संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.

काल राजधानी मुंबई येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दहावीचा निकाल कोणत्या तारखेला जाहीर होणार? याविषयी माहिती दिली आहे. केसरकर यांनी दहावीचा निकाल 27 मे 2024 ला जाहीर केला जाऊ शकतो अशी माहिती यावेळी दिली आहे.

यामुळे, दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची आतुरता देखील लवकरच संपणार असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान आता आपण दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी कुठे निकाल पाहू शकतात? याविषयी माहिती पाहणार आहोत.

mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल पाहता येणार आहे. जेव्हा बोर्डाकडून रिझल्ट डिक्लेअर होईल त्यावेळी या संकेतस्थळावर दहावीच्या निकालाची लिंक उपलब्ध होणार आहे.

या लिंक वर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला सीट क्रमांक आणि आईचे नाव टाकायचे आहे. यानंतर विद्यार्थी त्यांनी भरलेला तपशील सबमिट करून रिझल्ट चेक करू शकणार आहेत. रिझल्ट स्क्रीनवर आल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याची प्रिंट आउट देखील घेता येणार आहे.

Leave a Comment