आनंदाची बातमी ! Mhada ने ‘या’ भागातील 1495 घरांसाठी जाहीर केली लॉटरी, अर्ज कधीपर्यंत करता येणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mhada News : गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती अशा विविध महानगरांमध्ये घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. यामुळे अनेकांचे घराचे स्वप्न अजूनही पूर्ण झालेले नाही. घराच्या स्वप्नासाठी सर्वसामान्य अहोरात्र काबाडकष्ट करत आहेत.

घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या असल्याने आता म्हाडा आणि सिडकोच्या घरांना विशेष प्राधान्य दाखवले जात आहे. म्हाडा आणि सिडको परवडणाऱ्या दरात सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करून देत आहे.

म्हाडा छत्रपती संभाजी नगर मंडळांने देखील त्यांच्या कार्यक्षेत्रातील जवळपास 1495 घरांसाठी आणि भूखंडासाठी लॉटरी जाहीर केली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, फेब्रुवारी 2024 च्या अखेरीस छत्रपती संभाजीनगर मंडळाने लॉटरी जाहीर केली.

941 सदनिका आणि 361 भूखंड यामध्ये समाविष्ट करण्यात आले. यानंतर मंडळाने या लॉटरीमध्ये 193 सदनिका आणि गाळे ऍड केलेत. या लॉटरीसाठी 20 मे 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. मात्र या मुदतीत इच्छा असूनही अनेकांना काही तांत्रिक कारणांमुळे अर्ज सादर करता आला नाही.

परिणामी छत्रपती संभाजी नगर म्हाडा मंडळाने या लॉटरीसाठी अर्ज करण्याला मुदतवाढ द्यावी अशी मागणी नागरिकांच्या माध्यमातून केली जात होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर मंडळाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून आता या लॉटरीसाठी इच्छुक नागरिकांना 26 मे 2024 पर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

म्हणजेच छत्रपती संभाजीनगर मंडळाने जाहीर केलेल्या 2024 च्या या लॉटरीसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला सहा दिवसांची मुदत वाढ दिली आहे.

या नवीन वेळापत्रकानुसार, आता इच्छुक नागरिकांना 26 मे 2024 रात्री 11:59 पर्यंत अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे अनामत रकमेचा ऑनलाईन भरणा करण्याची अंतिम मुदत ही देखील 26 मे 2024 हीच आहे.

मात्र ज्या अर्जदारांना अनामत रक्कम बँकेत आरटीजीएस व एनइएफटीद्वारे भरायची असेल त्यांच्यासाठी अनामत रक्कम भरणा करण्यासाठी अंतिम मुदत 27 मे 2024 ही राहणार आहे. बँकेत जाऊन अनामत रक्कम भरणा करणाऱ्या अर्जदारांना 27 मे पर्यंत बँकेच्या वेळेत ही रक्कम भरता येणार आहे.

या सोडतीमध्ये मंडळाने छत्रपती संभाजी नगर शहर व जिल्हा, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव येथील विविध गृह प्रकल्पातील सदनिका आणि भूखंड विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत.

थापि इच्छूक नागरिकांनी लवकरात लवकर या लॉटरीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. या लॉटरी बाबतची संपूर्ण माहिती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

Leave a Comment