Maharashtra Government Employee : महाराष्ट्र राज्य शासनाने नुकताच राज्यातील एसटी महामंडळ अंतर्गत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सरसकट सहा हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार असा आशावाद व्यक्त होत आहे. खरंतर एसटी कर्मचाऱ्यांनी बोनस म्हणून पंधरा हजार रुपये देण्याची मागणी केली होती.
परंतु कर्मचाऱ्यांची ही मागणी सरकारने मान्य केली नाही आणि त्यांना सहा हजार रुपये एवढे सरसकट बोनस जाहीर केले आहे.
गेल्या वर्षी पाच हजार रुपये एवढे सरसकट बोनस देण्यात आले होते म्हणजेच यंदा बोनस मध्ये एक हजार रुपयाची वाढ करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त महाराष्ट्र राज्यातील राज्य विद्युत मंडळातील महानिर्मिती, महापारेषण, महावितरण कंपन्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना देखील बोनस जाहीर करण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांपाठोपाठ या कर्मचाऱ्यांसाठी देखील बोनस जाहीर झाला असल्याने यादेखील कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे.
किती बोनस जाहीर केला ?
महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण मध्ये कार्यरत असलेल्या वीज कर्मचाऱ्यांना, अभियंत्यांना आणि अधिकाऱ्यांना 18 हजार पाचशे रुपये एवढा बोनस जाहीर करण्यात आला आहे.
तसेच या कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक कामगारांना 12,500 रुपये एवढा बोनस जाहीर झाला आहे. यामुळे या संबंधित कामगारांची आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होईल असे चित्र तयार होत आहे.
किती कर्मचाऱ्यांना होणार फायदा
या निर्णयामुळे 74 हजार 844 वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि 3 हजार 909 सहाय्यक कामगार तसेच 23 ट्रेनि अभियंते यांना फायदा मिळणार आहे.
या निर्णयाचा या संबंधितांना निश्चित फायदा होणार आहे. खरंतर या तिन्ही कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून दिवाळी बोनसची मागणी केली जात होती.
दरम्यान, कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर या संबंधित कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनसची घोषणा केली आहे. विशेष बाब अशी की, हा जाहीर करण्यात आलेला दिवाळी बोनस या संबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीच्या पूर्वीच वर्ग केला जाणार आहे.