Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात गेल्या काही दिवसापासून हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. हवामानात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे नागरिकांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ऐन दिवाळीच्या काळात अवकाळी पावसाने हजेरी लावली असल्याने नागरिकांची दिवाळी पाण्यात गेली आहे. अवकाळी पावसामुळे सणासुदीच्या काळात नागरिकांचा हिरमोड झाला आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने देशातील पाच राज्यांमध्ये आगामी तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
खरतर राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात आता अवकाळी पाऊस थांबला आहे. यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
वास्तविक, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. याशिवाय झेंडू सहित काढण्यासाठी तयार झालेल्या सर्वच पिकांचे यामुळे नुकसान झाले आहे. तथापि हा अवकाळी पाऊस आगामी रब्बी हंगामासाठी पोषक राहणार असा दावा केला जात आहे.
दरम्यान हवामान विभागाने आगामी तीन दिवस देशातील पाच राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आपल्या महाराष्ट्रात मात्र गेल्या दोन दिवसांपासून हवामान प्रामुख्याने कोरडे पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे पुढील तीन दिवस राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असा हवामान अंदाज समोर आला आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणार असल्याचे सांगितले आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अंशता ढगाळ हवामान पाहायला मिळू शकते मात्र अवकाळी पाऊस कुठेच बसणार नाही असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. पण दक्षिण भारतातील पाच राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या राज्यात बरसणार अवकाळी पाऊस ?
आयएमडीने दक्षिण भारतातील पाच राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, मंगळवारपर्यंत बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. ते पश्चिम-वायव्य दिशेने सरकेल.
16 नोव्हेंबरपर्यंत कमी दाबाच्या क्षेत्रामुळे किनारपट्टी भागात पाऊस सुरू होईल. त्याचवेळी 15 नोव्हेंबरपासून दक्षिण भारतात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अंदमान निकोबार बेटांवर पुढील चार दिवस हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे.
याशिवाय तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, किनारी आंध्र प्रदेश आणि रायलसीमा येथे पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होणार असा अंदाज देण्यात आला आहे.
यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी अधिक सावध आणि सतर्क राहणे अपेक्षित आहे. IMD ने ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये १५ नोव्हेंबरला पाऊस पडणार असा अंदाज दिला आहे. तसेच पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागात 16 नोव्हेंबरला आणि 17 नोव्हेंबर रोजी ईशान्य आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.