सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 2024 मध्ये किती सार्वजनिक सुट्ट्या राहणार ? राज्य सरकारने जाहीर केली सुट्ट्यांची यादी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra State Government Employee News : येत्या दोन महिन्यात वर्ष 2023 निरोप घेणार आहे. 2023 अवघ्या दोन महिन्यांच्या काळात संपणार आहे. पाहता-पाहता हे चालू वर्ष संपत आले आहे. आता दोन महिन्यानंतर नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे.

अशा परिस्थितीत येत्या नवीन वर्षात किती दिवस शासकीय सुट्ट्या राहणार हा सवाल सरकारी कर्मचाऱ्यांकडून उपस्थित होत होता. शाळकरी विद्यार्थी, बँक कर्मचारी, सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना नवीन वर्षात किती दिवसांसाठी शासकीय सुट्ट्या राहणार याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली आहे.

दरम्यान या लोकांची ही उत्सुकता आता संपणार आहे. कारण की, राज्य सरकारने नवीन वर्ष सुरू होण्याच्या आधीच वर्ष 2024 मध्ये किती दिवस सार्वजनिक सुट्ट्या राहणार याची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने 2024 मधील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.

यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील वर्षी किती दिवस सुट्टी राहणार याची कल्पना येणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, पुढल्या वर्षी 24 दिवस सार्वजनिक सुट्ट्या राहणार आहेत. म्हणजे येत्या वर्षात जवळपास एका महिन्याच्या काळासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्ट्या राहणार आहेत. आता आपण या सुट्ट्यांची यादी जाणून घेणार आहोत. कोण-कोणत्या दिवशी शासकीय सुट्टी राहील याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

पुढील वर्षी कोणत्या तारखांना राहणार सुट्टी 

१. प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी शुक्रवार

२. छत्रपती शिवाजी महाराज जंयती १९ फेब्रुवारी सोमवार

३. महाशिवरात्री ८ मार्च शुक्रवार

४. होळी (दुसरा दिवस) २५ मार्च सोमवार

५. गुड फ्रायडे २९ मार्च शुक्रवार

६. गुढीपाडवा ९ एप्रिल मंगळवार

७. रमझान ईद ११ एप्रिल गुरुवार

८. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल रविवार

९. रामनवमी १७ एप्रिल बुधवार

१०. महावीर जयंती २१ एप्रिल रविवार

११. महाराष्ट्र दिन १ मे बुधवार

१२. बुद्ध पौर्णिमा १ मे गुरुवार

१३. बकरी ईद (ईद उल झुआ) १७ जून सोमवार

१४. मोहरम १७ जुलै बुधवार

१५. स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट गुरुवार

१६. पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) १५ ऑगस्ट गुरुवार

१७. गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर शनिवार

१८. ईद-ए-मिलाद १६ सप्टेंबर सोमवार

१९. महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर बुधवार

२०. दसरा १२ ऑक्टोबर शनिवार

२१. दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) १ नोव्हेंबर शुक्रवार

२२. दिवाळी (बलिप्रतिपदा) २ नोव्हेंबर शनिवार

२३. गुरुनानक जयंती २५ नोव्हेंबर शुक्रवार

२४. ख्रिसमस २५ डिसेंबर सोमवार बुधवार

Leave a Comment